आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी:पुण्यातील कोरोना निर्बंधात शिथिलता, दुकाने दिवसभर राहणार सुरु; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

पुणे4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • दोन्ही डोस घेतलेला लोकांना मॉलमध्ये प्रवेश

कोरोनाची दुसरी लाट कमी होताच राज्य सरकार कोरोना निर्बंधात शिथिलता देत आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या कोरोनाच्या नव्या नियमावलीत राज्यांतील 25 जिल्ह्यांना मोठा दिलासा देण्यात आला होता. मात्र, यामध्ये पुणेसह 11 जिल्ह्यांत हे निर्बंध कायम होते. या निर्णयामुळे व्यापारी संघटनांमध्ये मोठा रोष पाहायला मिळाला होता.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्यांचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोना निर्बंधांत शिथिलता देण्यात आली आहे. यामुळे दुकाने आता सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. याव्यतिरिक्त हॉटेल व्यावसायिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट्स आता रात्री 10 पर्यंत सुरू राहतील.

दोन्ही डोस घेतलेला लोकांना मॉलमध्ये प्रवेश
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. राज्यात आतापर्यंत लाखो लोकांना लस देण्यात आली आहे. परंतु, ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहे, त्याच लोकांना मॉलमध्ये प्रवेश मिळणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे.

पुण्यात कसे असतील नवीन नियम?

 • सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार.
 • हॉटेल-रेस्टॉरंट्स रात्री 10 वाजेपर्यंत राहणार सुरु.
 • मॉल रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहतील.
 • मॉल्समध्ये दोन लस घेतलेल्यांनाच प्रवेश.
 • पुणेकरांना मास्क वापरणं बंधनकारक राहील.
 • हॉटेल चालक आणि दुकानदारांना लसीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक.
 • पुण्यातील सर्व उद्यानं नियमित वेळेनुसार सुरु राहणार.
 • जलतरण तलाव वगळता इतर आऊटडोअर खेळांना परवानगी.
 • 7 टक्क्यांच्या पुढे पॉझिटिव्हीटी रेट गेल्यास पुन्हा निर्बंध.
बातम्या आणखी आहेत...