आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमुख्यमंत्र्यांची मिश्किल टिप्पणी:पुणेकरांनी नावं ठेवण्यात देवांनाही सोडलं नाही; संजीवन उद्यानाचे अजित पवारांनी केले भूमिपूजन

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुणेरी पाट्यांची देशभरात चर्चा

नाव ठेवण्याच्या बाबतीत पुणेकरांच हात कोणी पकडू शकत नाही, पुणेरी पाट्याचं कुतूहल सगळ्यांना आहे. पासोड्या मारुती, सोट्या म्हसोबा, खुन्या मुरलीधर, उपाशी विठोबा, ताडीवाला दत्त, डुल्या मारुती, जिलब्या मारुती, भिकारदास मारुती असे नाव पुणेकरांनी ठेवले आहे. नाव ठेवण्यात पुणेकरांनी देवांनाही सोडलं नाही. असा मिश्किल टोला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी लगावला आहे. ते आज पुण्यातील भव्य संजीवन उद्यानाचे भूमिपूजन सोहळ्यादरम्यान बोलत होते.

पुणेरी पाट्यांची देशभरात चर्चा
अजित पवार पुढे म्हणाले की, सध्या सोशल मीडियामुळे पुणेरी पाट्यांची देशभरात चर्चा असते. पुण्यातील गावाचे नाव, मंदिरांचे नाव हेदेखील कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय ठरत असतो. विशेष म्हणजे पुण्यात काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदीरदेखील उभारण्यात आले होते. पुणेकरांनी नाव ठेवण्यात देवानांही सोडल नाही असं तिथं ठिकाणांची काय कथा? असं उपमुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले.

संजीवनी उद्यानाचे केले भूमिपूजन
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी पुण्यातील संजीवन उद्यानाचे भूमिपूजन केले. पुण्यातील वारजे परिसरात वन विभागाच्या 35 एकर जागेवर हे उद्यान उभारले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी अजित पवार कार्यक्रमस्थळी सकाळीच दाखल झाले. कार्यक्रमाचे भूमिपूजन आटोपल्यानंतर त्यांनी हे विधान करत कार्यक्रमात एकच हशा उडाला.

बातम्या आणखी आहेत...