आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांचे एसटी संपकऱ्यांना आवाहन:चांगले पगार तेही वेळेवर देण्याची जबाबदारी आमची, संपाबाबत कुणी काही वेगळे सांगत असेल तर लक्ष देऊ नका

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार देण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. यासोबतच त्यांना चांगला पगार देण्याचाही प्रयत्न करू. त्यामुळे त्यांनी आता संप मागे घेवून कामावर रुजू व्हावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच, आता तुमच्या मुलाबाळांचीही शाळेत जाण्याची अडचण होत आहे. त्यामुळे संपाबाबत कुणी काही वेगळे सांगत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले. पुण्यातील इंदापूर येथील एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. त्यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही भाष्य केले.

राज ठाकरेंना प्रत्युत्तर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे राज्यात जातीपातीचे राजकारण वाढले, असा आरोप काल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला होता. आज त्यावरदेखील अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. शरद पवारांनी कधीही जातीधर्माचे राजकारण केले नाही. सर्वधर्मसमभाव या धोरणाप्रमाणेच त्यांचे राजकारण होते. महाराष्ट्रातले राजकारम शरद पवारांभोवती फिरते. त्यामुळे काही लोक उगीचच त्यांची बदनामी करत असतात, असे अजित पवार म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी परिस्थिती चांगली हाताळली!
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेकजणांनी हे सरकार लगेच पलेल, असे भाकित वर्तवले होते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली. तिन्ही पक्षांमध्ये आता चांगला ताळमेळ असून हे सरकार आपले 5 वर्षे पूर्ण करेल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

'ध' चा 'मा' करून वातावरण गढूळ केल जातय!
आमदारांना मोफत घरे देण्यावरून महाविकास आघाडी सरकारवर सध्या जोरदार टीका केली जात आहे. यावर अजित पवार म्हणाले, आमदारांना मोफत घरे देण्याचा निर्णय झालेलाच नव्हता. मात्र, 'ध' चा 'मा' करून वातावरण गढूळ केल जातय आणि विनाकारण सरकारवर टीका केली जात आहे. तरीही यावरून एवढा वाद होत असेल तर नको ती घरे. त्यापेक्षा आहे ती स्थिती बरी आहे, असे अजित पवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...