आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पा निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला:पुण्यात गणरायाच्या निरोप सोहळ्याचा उत्साह पोहचला शिगेला

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात मोठ्या उत्साहात बाप्पांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. नाशिक ढोल, बाप्पांचा जयघोष आणि डिजेच्या तालावर थिरकणारी भक्तांच्या पावलाने अवघा रंग एक झाला, असे चित्र आहे.

सकाळी दहा वाजता मंडईतील टिळक पुतळा येथून विसर्जन मिरवणूक सुरू झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, विधान परिषद सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार सचिन अहिर यावेळी उपस्थित होते.

कसबा गणपती मंडळ

ग्रामदैवत श्री कसबा गणपती या मनाच्या पहिल्या गणपती मंडळाच्या मिरवणुकीमद्धे नगारखाना, आर्ट ऑफ लिव्हिंग, प्रभात बॅंड, कामायणी प्रशाला, बँक ऑफ इंडिया आणि रोटरी क्लबची पथके आहेत. रमणबाग, रुद्र गर्जना, आणि कलावंत ही तीन ढोल ताशा पथके मिरवणुकीत सहभागी झाली आहेत. चांदीच्या पालखीत विराजमान झालेली गणरायची मूर्ती हे वैशिष्ट्य आहे.

तांबडी जोगेश्वरी मंडळ

श्री तांबडी जोगेश्वरी या मनाच्या दुसऱ्या गणपती मंडळाच्या मिरवणुकीच्या अग्रभागी सतीश आढाव यांचा नगारा वादानाचा गाडा आणि न्यू गंधर्व बॅंड पथक आहे. समर्थ प्रतिष्ठान, शिवमुद्रा आणि ताल ही ढोल तशा पथके तसेच विष्णू नाद हे शंख वादकांचे पथक, पारंपरिक पेहेरवतील अश्वारूढ कार्यकर्ते मिरवणुकीत आहेत.

गुरुजी तालिम मंडळ

मनाच्या तिसऱ्या गुरुजी तालिम मंडळाच्या गणपतीची मिरवणूक सरपाले बंधू यांनी साकारलेल्या भक्ति रथातून निघाली आहे. या रथावर फुलांच्या सजावटीसह विठ्ठल राखुमाई, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांची प्रतिकृती आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर यांचा नगारा वादानाचा गाडा आहे.

तुळशी बाग मंडळ

फुलांच्या आकर्षक सजवटीने साकारलेल्या श्री गाजमुख रथामद्धे तुळशी बाग मंडल या मनाच्या चौथ्या गणपतीची मिरवणूक निघाली आहे. लोणकर बंधुचा सनई आणि नगारा वादन अग्रभागी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त साकारलेला विशेष रथ त्या मागे आहे.

केसरी वाडा गणपती

मानाच्या पाचव्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत बीडवे बंधू यांचा नगारा वादानाचा गाडा आहे. फुलांनी सजवलेल्या मेघडंबरी रथामद्धे गणरायाची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...