आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआषाढी वारीकरिता येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी. वारीचे वेळापत्रक, कार्यक्रम यांची माहिती होण्यासाठी व भाविकांना आवश्यक त्या सोयी-सुविधासाठी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने आषाढी वारी 2022 ॲप विकसित केले आहे. त्यामुळे जे पहिल्यांदा वारी करत आहेत आणि जे जुने-जाणते आहेत, अशा दोहोंना याचा फायदा होणार आहे.
अॅपमध्ये नेमके काय?
आषाढी वारी ॲपमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गाचे वेळापत्रक, गावनिहाय नकाशा, पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या थेट दर्शनाची सोय, पालखीचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख यांचे संपर्क क्रमांक, वैद्यकीय सुविधा त्यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी, फिरते वैद्यकीय पथक, शासकीय रुग्णालये व वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकरी, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, पाण्याच्या सुविधेच्या दृष्टीने मार्गावरील टॅंकर सुविधा, अन्न पुरवठा, वितरण, विद्युत सेवा, पशुधनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.
असे घेता येईल अॅप
पालखी सोहळ्याशी संबंधित विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकदेखील या ॲपमध्ये देण्यात आले आहेत. भाविकांनी गुगल प्लेस्टोवरील https://play.google.com/store/apps/details?id=com.deecto.ashadhiwari या लिंकवरून आषाढी वारी 2022 हे ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. तसेच भाविकांनी वारीदरम्यान अडचणीच्या वेळी या ॲपवरील संबंधित संपर्क अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.