आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Devendra Fadnavis Continues To Attack Says Shiv Shiv Senas Helplessness Was Seen In 2019 Won Election On Modi Photo | Marathi News 

भाजपचा इतिहास हिंदुत्वाचा:‘शिवसेनेची लाचारी 2019 ला दिसली, मोदींचा फोटो लावून निवडणूक जिंकली’ देवेंद्र फडणवीसांची शिवसेनेवर घणाघाती टीका

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात एमआयएमने महाविकास आघाडी सरकारला युतीची साद घातल्यानंतर राज्यातील राजकारण आणखीणच तापले आहे. त्यापार्श्वभूमीवर आता राज्यात विरोधात बसलेल्या भाजपने शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्यावरुन डिवचायला सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेतेही कालपासून शिवसेनेवर याच मुद्द्यावरुन हल्लाबोल करताना पाहायला मिळत आहे. आज पुन्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा उल्लेख लाचार म्हणून केला आहे. शिवसेनेची लाचारी 2019 ला दिसली, मोदींचा फोटो लावून निवडणुका जिंकली, असे म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर जोरदार घणाघात केला आहे. शिवसेना सत्तेसाठी लाचार होऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेली, त्यांनी आम्हाला लाचारी शिकवू नये. असा पलटवार फडणवीस यांनी केला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेपासून भाजप आणि शिवसेनेची युती तुटली होती. तेव्हापासून भाजप शिवसेनाला वेगवेगळ्या मुद्यांवरुन धारेवर धरताना पाहायला मिळत आहे.

भाजपचा इतिहास हिंदुत्वाचा
पुढे फडणवीस यांनी एमआयएम युतीबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, एमआयएमसोबत जावे किंवा नाही तो त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांचे लोकं आज जनाब बाळासाहेब ठाकरे बोलत आहेत, अजान स्पर्धा घेत आहेत. राष्ट्रीय प्रश्नावर ते मोदींना विरोध करत आहेत, मात्र 370 कलम हटवले तेव्हा संपूर्ण देश एक होता, तेव्हा हे विरोध करत होते. त्यांना इतिहास माहिती नाही, 370 कलम हटवणारी भाजप आहे, राम मंदिर बांधणारी भाजप आहे, लाल चौकात तिरंगा लावायला शिवसेना नव्हती गेली भाजप गेली होती. असे म्हणत फडणवीसांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

शिवसेनेच्या हिंदुत्वात भेसळ नाही- मुख्यमंत्री
येत्या 22 मार्चपासून विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू होत आहे. त्यानिमित्त शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुखांना शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी गेल्या काही दिवसांपासून आघाडीत सहभागी होण्याबाबत एमआयएमने दिलेल्या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. शिवसेना हिंदुत्ववादी होती आणि राहिल. शिवसेनेच्या हिंदुत्वामध्ये भेसळ नाही. एमआयएम ही भाजपची 'बी' टीम आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत युती कदापीही करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

शिवसेना अंगार आहे, हे दाखवून द्या!
एमआयएमच्या ऑफरमागे व्यापक कट आहे. शिवसेनेला, शिवसेनेच्या हिंदुत्वाला बदनाम करण्याचे हे कारस्थान आहे. यामागे भाजपच असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, शिवसेनेच्या भगव्याला बदनाम करणाऱ्यांना नेस्तनाबूत करा. शिवसेना अंगार आहे, भाजप भंगार आहे हे दाखवून द्या, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसंपर्क अभियान यशस्वी करुनच या, अशा शुभेच्छा देताना शिवसेनेची ताकद राज्यभर वाढवा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुख व खासदारांना दिले. गेल्या विधानसभा निवडणुकीत जे मतदारसंघ भाजपने जिंकले, त्या ठिकाणी जोरदार तयारी करा. भाजपची जिथे ताकद आहे, तिथे आपली ताकद वाढली पाहिजे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

बातम्या आणखी आहेत...