आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्तीचे मैदान आणि पहिलवान:शिवसेनेच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार; म्हणाले, ही तर महाविकास आघाडी आणि 'एमआयएम'ची एकत्रित 'कुस्ती'

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयएमने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत येण्याचा प्रस्ताव दिला आहे. यावरून राज्याच्या राजकारण तापलेले दिसून येत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंपी यावर भाष्य केले आहे. आम्ही एमआयएमसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर शिवसेनेकडून हा प्रस्तावामागे फडणवीस यांचा हात आहे, असे सांगण्यात येत आहे. याला उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. यात ही सर्व मिलीजुली कुस्ती आहे, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे नेते एकदम सक्रिय झाले आहेत. 4 राज्यात भाजपला आलेले यशामुळे देवेंद्र फडणवीस जबरदस्त कॉन्फिडंट झाले आहेत. मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊ शकत नाही असा उपरोधात्मक टोला त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. राज्यात नवे राजकीय समीकरण जुळणार का असा प्रश्न अनलेकांना पडला होता. मात्र मुख्यमंत्री ठाकरेंनी नकार दिला आहे. यानंतर फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. जे अजान स्पर्धा घेऊ शकतात ते काहीही करू शकतात, जे स्व:त जनाब बाळासाहेब लिहतात वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी लिहणार ते, त्यांच्यातील एक पक्ष आघाडी करायची म्हणतो, तर हे त्याला विरोध करतात. ही त्यांची मिलीजुली कुस्ती आहे, ते सगळे मिळून खेळताहेत. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आघाडीला स्पष्ट नकार देऊनही इम्तियाज जलील त्यांची भेट घेणार आहेत. ईतकेच नाही तर ते शरद पवारांची देखील भेट घेणार आहेत. 22 मार्चपासून शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू होणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यात त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. यास पलटवार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपने मेहबुबा मुफ्तीसोबत सरकार स्थापन केले. आणि ते आमच्यावर आरोप करत आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...