आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्टी असलेले अभ्यासू नेतृत्व, प्लॅनर आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात जेव्हा ते बिहारमध्ये गेले तेव्हा त्यांनी संपूर्ण माहिती घेऊन योजनाबद्ध नियोजन केले. दुर्दैवाने कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे अंतिम टप्प्यात ते बिहारमध्ये जाऊ शकले नाहीत. ते दूरदृष्टीचे नेते असल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे. पी.नड्डा यांनी त्यांच्यावर बिहारची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे बिहार निवडणुक विजयामध्ये देवेंद्र फडणवीस यांचेदेखील योगदान महत्त्वाचे आहे. नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये एनडीए जिंकेल. परंतु देवेंद्र फडणवीस यांचे योगदानदेखील बिहार निवडणुकीत महत्त्वाचे आहे, असे मत माजी मंत्री राम शिंदे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
शिंदे म्हणाले, बिहार निवडणुकीच्या निकालादरम्यान सध्या एनडीए आघाडीवर आहे. याचा अर्थ एक्झिट पोल आणि सी व्होटर यांची मते सरळ अपयशी होताना दिसत आहेत. निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पार्टी आणि नितीशकुमार यांच्या विरोधात जनमत जाणार, असा समज पसरवला जात होता तो आता निकालाच्या पार्श्वभूमीवर खोटा ठरताना दिसत आहे. बिहार राज्याला पुढे घेऊन जात असताना नितीश सरकारने दळणवळणाची साधने निर्माण केली, शिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्या, वीज जोड दिले, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सोडविले याला बिहारच्या जनतेने प्रतिसाद दिला. त्यामुळेच बिहार मध्ये एनडीएला मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळताना दिसत आहे. अंतिम निकालही एनडीएच्या बाजूनेच लागेल आणि बिहारमध्ये फक्त एनडीएचेच सरकार येईल. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.