आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांचे जयंत पाटलांना प्रत्युत्तर:पावरफुल्ल नेत्या असूनही इंदिरा गांधींना पराभवाचा सामना करावा लागला, गैरसमजात राहू नका

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्याकाळी इंदिरा गांधी पावरफुल्ल नेत्या असूनही एकेकाळी त्यांचा पराभव झाला हाेता. त्यामुळे काेणीही गैरसमजात राहू नये असा टाेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना लगावला आहे.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, भगवा झेंडा डाेळयासमाेर ठेवून एकनाथ शिंदे साेबत आल्याने राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन झाले आहे. आता काळजी करण्याचे कारण नाही. भटक्या विमुक्त समाजाला त्यांच्या जातीचे प्रमाणपत्र जवळच्या ठिकाणी देण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. रामाेशी समाजाला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे मत फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केले.

यांची उपस्थिती

राजे उमाजी नाईक यांच्या 231 व्या जयंती निमित्ताने आयाेजित पुरंदर परिसरातील भिवडी येथील कार्यक्रमात ते बाेलत हाेते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री विजय शिवतारे, आमदार राहुल कुल, माजी आमदार याेगेश टिळेकर उपस्थित हाेते.

स्वराज्याची ज्याेत पेटवली

फडणवीस म्हणाले, ज्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्यांचे स्मरण झाले पाहिजे. स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायांनी केली. बहर्जी नाईक यांच्यासारखे गुप्तहेर खाते सांभाळणारे सक्षम मावळे शिवरायांकडे हाेते. स्वराज्य अडचणीत आल्यानंतर पुन्हा एकदा स्वराज्याची ज्याेत पेटविण्याचे काम राजे उमाजी नाईक यांनी केले.

प्रत्येकाला न्याय दिला

ब्रिटीशांनी त्यांच्या समाजाला जाणीवपूर्वक अपराधी ठरवून गुन्हेगारी समाज हा कायमस्वरुपी शिक्का मारला. यामागे एकच कारण हाेते की, या समाजाला जेरबंद केले नाही तर हे आपणास भारतावर राज्य करु देणार नाही. राज्यकारभार करताना उमाजी नाईक यांनी सनद तयार करुन प्रत्येकाला न्याय देण्याचे काम करत आदर्श राजासारखे काम केले. सव्वादोनशे वर्षानंतर देखील आपण त्यांच्यासमाेर नतमस्तक हाेताे.

जयंत पाटील काय म्हणाले होते?

भाजपवर टीका करताना जयंत पाटील म्हणाले, बारामतीमधील जनता कशी आहे याची मला माहिती आहे. त्यामुळे कोणीही बारामतीत आले तरी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना मिळतेच. एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो, तो त्रास शरद पवारांच्या बारामतीत भाजपला होत आहे. बारामतीमध्ये अनेकांनी खोदून पाहिले पण पाणी लागले नाही. बारामतीत सूर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल, परंतु बारामती पवारांना सोडणार नाही, एवढे ते घट्ट नाते आहे.

पुरंदर विमानतळास ग्रामस्थांचा विराेध

पुरंदर तालुक्यात नवीन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळ ठरलेल्या जागेवरच हाेईल असे सूतोवाच दिले हाेते. त्यानंतर याप्रकरणी पुरंदर मधील सात गावातील शिष्टमंडळाने फडणवीस यांची भेट घेऊन पुरंदर विमानतळास जागा देण्यासाठी विराेध दर्शवला आहे. दरम्यान,उपमुख्यमंत्री यांनी याबाबत नागरिकांशी चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी भूमिका मांडली.

बातम्या आणखी आहेत...