आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपतीचे दर्शन:थायलंडचे भक्त दगडूशेठ चरणी लीन, 225 किलो बुंदीचा मोदक अर्पण

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे उत्सवाच्या १३० व्या वर्षी मालाणी परिवाराचे दीपक मालाणी व निखिल मालाणी यांनी २२५ किलो बुंदीचा मोदक श्रींना अर्पण करण्यात आला. नैवेद्य दाखवून हा मोदक प्रसाद म्हणून भक्तांना वाटला. साजूक तुप, केसर, मोतीचुर, ड्रायफ्रूट वापरून हा मोदक साकारण्यात आला होता. तसेच महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाकडून अंतर्गत थायलंड येथील ७० गणेशभक्तांनी एकाच वेळी उत्सव मंडपात येऊन गणरायाची आरती केली.

थायलंड येथून आणलेल्या गणेशमूर्ती समोर ठेवून त्यांनी आरती केली. ते म्हणाले, आम्ही दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्याकरिता येतो. मागील दोन वर्षे कोविड संकटामुळे येता आले नाही. यंदा आम्ही आलो.

बातम्या आणखी आहेत...