आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:जेजुरी गडावर तीन दिवस भाविकांना प्रवेशबंदी, साेमवती यात्रा, पालखी साेहळा रद्द

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या प्रमुख देवस्थांनैपकी एक असलेल्या जेजुरी गडावर यंदा काेराेना विषाणूचा प्रसार वाढू नये या पार्श्वभूमीवर साेमवती अमावास्या यात्रा आणि पालखी साेहळा रद्द करण्यात आला आहे. दरवर्षी लाखाे भाविक साेमवती अमावास्येला जेजुरीत दाखल हाेत असल्या कारणाने यंदा १२ ते १४ डिसेंबरदरम्यान भाविकांना जेजुरीत प्रवेश बंदी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली आहे.

राज्यभरातील मंदिरे सरकारने देवदर्शनासाठी खुली केली असली तरी साेमवती अमावस्येला जेजुरीत राज्यभरातून हाेणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता प्रवेश बंदी करण्यात आल्याने भाविकांनी जेजुरीत येऊ नये, असे आवाहन जेजुरी पाेलिसांनी केले आहे. देवस्थानच्या विश्वस्तांचे बैठकीत यंदा साेहळा साधेपणाने साजरा करण्याचा आणि ठराविक लाेकांच्या उपस्थितीत पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १४ डिसेंबर राेजी साेमवती अमावास्या असल्याने भाविक देव दर्शनासाठी व देव आंघाेळीसाठी कऱ्हा नदीवर लाखाेंच्या संख्येने गर्दी करतात. खंडाेबा मंदिर व कडेपठार मंदिर तसेच जेजुरी शहरात सुमारे एक ते दाेन लाख भाविक यात्रेसाठी येतात. यंदा शनिवार, रविवारला जाेडून साेमवती अमावास्या असल्याने माेठया प्रमाणात जेजुरीत भाविक येण्याची शक्यता आहे. तसेच जेजुरी गडावर १३ डिसेंबरला राजमाता पुण्यश्लाेक आहिल्यादेवी हाेळकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण हाेणार असल्याने महत्त्वाचे व्यक्तीही येणार आहेत. या पार्श्वभूमीवर ही बंदी घालण्यात आली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser