आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:आसारामच्या सुटकेसाठी भक्तांचा पुण्यात मोर्चा

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आसाराम बापू याच्या अटकेला ३० ऑगस्टला ९ वर्षे होऊनही जामीन, पॅरोल न मिळाल्याने तो मिळावा, फास्ट ट्रॅक कोर्टामधून तातडीने न्याय मिळावा, या मागणीसाठी श्री योग वेदांत सेवा समिती (पुणे) साधक मंडळीतर्फे पुण्यात मंगळवारी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे आणि लगतच्या जिल्ह्यातून आलेले भक्त या मूक मोर्चात सहभागी झाले हाेते. काळया फिती बांधून शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर मंगळवारी मूक मोर्चाला प्रारंभ झाला. साधकांमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. सर्वांनी शुभ्र कपडे परिधान करून दंडाला काळया फिती लावल्या होत्या. हातात भगवे ध्वज घेतले होते.‘बापूजी को रिहा करो ‘, ‘संत न होते तो जल मरता संसार..नही सहेंगे अत्याचार असे फलक झळकवले.

बातम्या आणखी आहेत...