आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिक्‍कीचे अध्‍यक्ष मिलिंद कांबळे यांचे प्रतिपादन:सीआयआय आणि डिक्की पुण्यासह देशभरात 5 राष्ट्रीय रासेयो केंद्रे सुरू करणार

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे, हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली, भोपाळ या प्रमुख शहरांत राष्ट्रीय रोजगार सेवा योजना केंद्र सुरू करून देशभरातील दहा हजार दलित तरुणांना येत्या वर्षभरात उद्योग क्षेत्रात नोकऱ्या देणार असल्याचा निर्धार दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे संस्थापक व आयआयएम जम्मूचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी रविवारी येथे व्यक्त केला.

दलित तरुणांना उद्योजक बनवण्याचे स्वप्न साकार करण्याचे कार्य करणाऱ्या दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) या संस्थेने आज हैदराबाद येथे राष्ट्रीय रोजगार सेवा योजना केंद्र सुरू केले. लवकरच देशातील पुणे, बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद येथे या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. पुण्यात सुरू झालेल्या या संस्थेने आता देशभरात व जगभरात डिक्कीच्या कार्याचे जाळे पसरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आज हैदराबाद येथेही नवीन केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी कांबळे बोलत होते. ते म्हणाले, ‘देशभरातील दलित तरुणांना उद्योजक आणि रोजगार निर्माण करण्यासाठी सीआयआय आणि डिक्की देशभरात आणखी पाच राष्ट्रीय मॉडेल करिअर सेंटर सुरू करणार आहे. एससी-एसटी समुदायातील तरुणांना मार्गदर्शन, कौशल्य आणि व्यवसाय प्रशिक्षण प्रदान करण्याच्या उद्देशाने एमसीसी सुरू करण्यात आली आहे. देशात ४२ मॉडेल करिअर सेंटर कार्यरत आहेत. या केंद्रातून तरुणांना नोकरीसाठी आवश्यक प्रशिक्षण, मार्गदर्शन व नोकरी मिळवून देण्याचे काम होणार आहे.

पुढे म्हणाले की सीआयआय आणि डिक्कीने भागीदारीने चांगले काम केले आहे आणि समुदायातील १० हजारांहून अधिक तरुणांना समुपदेशन, कौशल्य, सहरोजगार मोठ्या प्रमाणात मिळण्याची आशा आहे. आयआयएममध्ये डायव्हर्सिटी सेल, राजस्थानमधील उद्योजकतेसाठी इन्क्युबेशन कम ट्रेनिंग सेंटर, उद्योजकता, रोजगार क्षमता, रोजगार आणि शिक्षणाचा अजेंडा लागू करण्यासाठी तसेच पुरवठादारांच्या विविधतेवर काम करण्यासाठी एकत्र काम करत आहेत.

सर्वतोपरी सहकार्य तेलंगण स्टेट कौन्सिलचे अध्यक्ष सी. सी. शेखर रेड्डी यांनी मॉडेल करिअर सेंटर वाढवण्यासाठी सदस्यांकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. राष्ट्रीय अध्यक्ष आर. के. नारा, काॅन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालक संगीता राॅय चौथरी तसेच उद्योग विश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...