आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांचे उत्तर:परदेश दौऱ्यावर असल्याने कार्यक्रमात दिसलो नाही, विनाकारण बदनाम केले -  माजी मंत्री अजित पवारांचे उत्तर

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील आठवडाभरात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नव्हते. त्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत होत्या. पवार हे शुक्रवारी मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे येथे दौऱ्यावर होते. गेल्या आठवडाभरात ते सार्वजनिक कार्यक्रमांत दिसले नव्हते. दरम्यान, आठवडाभर अजित पवार कुठे होते यावरील प्रश्नावर त्यांनी मी परदेश दौऱ्यावर होतो. माझ्याबाबतीत अशा वावड्या उठवल्या जातात, असे उत्तर देत त्यांनी या चर्चांना विराम दिला.

शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मंथन शिबिर झाले. त्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उपचारानंतर हजर राहिले होते. पण, विरोधी पक्षनेते अजित पवार हे अनुपस्थित असल्याने चर्चा झाली. तसेच ते नाराज असल्याचेही म्हटले जात होते. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत गेल्या आठवड्यात आक्षेपार्ह वक्तव्य केले. तेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक होत प्रतिक्रिया दिल्या. पण अजित पवार यांनी मौन बाळगले होते. पवार म्हणाले की, “मी पाच दिवस आजारी होतो. खोकला होता आणि प्रकृती बरी नव्हती. आता तब्येत बरी आहे. पण माझ्याबाबत काहीही बातम्या सुरू होत्या. मी परदेश दौऱ्यावर होतो. हा माझा नियोजित दौरा होता. त्यामुळे कारण नसताना मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. जनमानसात नाहक माझी बदनामी करण्यात येते.

मनसेच्या काळेंनी केली होती खोचक पोस्ट अजित पवार हे सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नसल्याने मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी सोशल मीडियावर खोचक पोस्ट केली होती. त्यांनी दादा नाराज तर नाहीत ना, गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवून राहा रे.. कुछ तो गडबड है, असे ट्वीट त्यांनी केले होते.

बातम्या आणखी आहेत...