आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंब्याची थेट विक्री:पहिल्या चारच दिवसांत 9 हजार डझन आंब्याची थेट विक्री; 65 लाख रुपयांची झाली उलाढाल

जयश्री बोकील | पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंबा उत्पादकांना कुठल्याही मध्यस्थाशिवाय आपले उत्पादन थेट ग्राहकापर्यंत नेण्यासाठी राज्य कृषी पणन मंडळाने सुरू केलेल्या आंबा महोत्सवाला सुरुवातीपासूनच ग्राहकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. अवघ्या चार दिवसांत आंबा महोत्सवात ९ हजार डझन आंबा विकला गेला असून, ६५ लाखांची उलाढाल झाल्याचे चित्र समोर आले आहे. आंबा महोत्सव नुकताच (१ एप्रिल) सुरू झाला असून ३१ मेपर्यंत ग्राहकांना उत्पादकांकडून थेट खरेदी करता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत आयोजित या आंबा महोत्सवाची माहिती दिवसेंदिवस अधिकाधिक आंबा उत्पादकांपर्यंत पोहोचत आहे. ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ या योजनेअंतर्गत पुण्यात गुलटेकडी, मार्केट यार्ड येथे आंबा महोत्सवाचे आयोजन २००२ पासून करण्यात येत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

आंबा महोत्सवाचे वेगळेपण आहे असे सलग दोन महिने सुरू राहणारा राज्यातील एकमेव महोत्सव असून एकच उत्पादन (कमोडिटी) विकले जाते, असा हा एकमेव महोत्सव आहे. कोकणातील १०५ आंबा उत्पादकांचा यामध्ये सहभाग आहे. या महोत्सवात उत्तम प्रतीचा आंबा खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. उत्पादक आणि ग्राहक यामध्ये थेट सेवा, कुठलाही मध्यस्थ नाही. कोकणातील आंब्यांचे वैविध्य चाखण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. ------------- n