आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Dissenters Were Exterminated By The Religious; Dr. By The Superstition Eradication Committee. Greetings To Dabhaelkar | Marathi News

बाबा आढावांची टीका:विराेधात जाणाऱ्यांना धर्मवाद्यांनी संपवले ; अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे डाॅ. दाभाेलकरांना अभिवादन

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डाॅ.नरेंद्र दाभाेलकर यांच्या खुनाच्या घटनेस नऊ वर्षांचा कालावधी उलटला असला तरी आजही त्यांची आठवण आम्हा सर्वांना येते. अंधश्रद्धेविराेधात त्यांनी नेहमी लढा दिला आणि विज्ञानाच्या पातळीवर त्या टिकत नसल्याचे सप्रमाण सिद्ध केले. जे स्वत:ला धर्मवादी म्हणवतात आणि जातींचा अभिमान बाळगतात, त्यांना आमचा कडवा विराेध आहे. धर्मवाद्यांनी जे विराेधात जातील त्यांना संपवण्याचे काम सुरू केले असल्याची टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी शनिवारी केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डाॅ.नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येस नऊ वर्षांचा कालावधी शनिवारी पूर्ण झाला. यानिमित्ताने शनिवारी पुण्यात अंनिसतर्फे निभर्या वाॅकचे आयाेजन केले हाेते.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना बाबा आढाव म्हणाले, स्वत: पळपुटेपणा करून त्यांनी राज्य ताब्यात मिळवले असून नैतिक मूल्यांचा चुराडा केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, दहीहंडी कितीही उंच करा, त्यात भाग घेणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस मिळेल. ही बाब अयाेग्य आहे. आपला आधार जनता आणि नैतिक मूल्ये असून प्रगतीच्या दृष्टीने त्याची जपणूक झाली पाहिजे. जात, धर्म या अंधश्रद्धा असून ते विज्ञानाच्या कसाेटीवर टिकत नाही. अंनिस आपले काम करत आहे.

बातम्या आणखी आहेत...