आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना योद्ध्यांचा सन्मान:जागतिक मधमाशी दिवस निमित्त कोरोना योद्धांना मधाचे वाटप

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मधुमक्षिका पालक विजय महाजन यांनी केला कोरोना योद्ध्यांचा सन्मान

जागतिक मधमाशी दिवस निमित्ताने पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील मधुमक्षिका पालक विजय महाजन यांनी कोरोना आजाराविरोधात लढणारे डॉक्टर, नर्स हे आरोग्य सेवक, सफाई कर्मचारी, वीज वितरण कंपनी कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांना मध देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी विजय महाजन आणि विशाल महाजन यांनी मधमाशी बाबत माहिती सर्वांना दिली.

महाजन याबाबत म्हणाले, दरवर्षी जागतिक मधमाशी दिवस निमित्ताने सवलत दारात सर्व नागरिकांना मध विक्री करण्यात येते. मधमाशी पालन व्यवसायातून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होत आहे. त्यासोबत शेती मधील उत्पन्न वाढत आहे. जागतिक तापमान वाढत असताना त्याचा मधमाशीवर ही परिणाम होत आहे.  सध्या कोरोनाचे संकट मोठे असून अशावेळी माणसाच्या शरीरात प्रतिकारशक्ती चांगल्याप्रकारे असणे महत्वाचे आहे. यादृष्टीने मध शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते.

बातम्या आणखी आहेत...