आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीचे वितरण

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करून “कृतज्ञता पर्व’ साजरे करण्याच्या हेतूने विशेष कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मालोजीराजे छत्रपती म्हणाले की, विस्थापित आणि उपेक्षित वर्गातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी छत्रपती शाहू महाराजांची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली असून अनेक विद्यार्थी शिकून भविष्यात आपल नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास वाटतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंगच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुकही केले. याप्रसंगी ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे सचिव मालोजीराजे छत्रपती आणि संस्थेचे अॅड. भगवानराव साळुंखे (अध्यक्ष, व्यवस्थापन समिती) आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोनाली जाधवे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...