आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:कोर्टात घटस्फाेट घेतला; कुटुंबावरच बहिष्कार, जातपंचायतीच्या 14 जणांविरुद्ध गुन्हा

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जातपंचायतीएेवजी न्यायालयात घटस्फाेटाचा दावा दाखल केल्याने गेल्या पावणेतीन वर्षांपासून वाकड परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबास सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यानंतर जात पंचायतीच्या १४ जणांविरोधात वाकड पाेलिस ठाण्यात सामाजिक बहिष्कारविराेधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सीताराम कृष्णा सागरे (३३, रा. वाकड, पुणे) यांनी पाेलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार करेप्पा मारुती वाघमारे, बाजीराव वाघमारे, साहेबराव वाघमारे, माेहन शामराव उभाडे, मनाेज सागरे, विजय सागरे, रामदास भाेरे, अमर भाेरे, महादेव भाेरे, मारुती वाघमारे, विष्णू वाघमारे, अमृत भाेरे, गाेविंद भाेरे (सर्व रा. वाकड, पुणे) यांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीताराम सागरे यांचा जानेवारी २०१३ मध्ये शीतल भाेरे यांच्याशी विवाह झाला. मार्च २०१८ मध्ये काैटुंबिक वादातून शीतल माहेरी निघून गेली. त्यानंतर पत्नीने अलिप्त हाेण्यासाठी काैटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला. परंतु याबाबत माहिती मिळताच, जातपंचायतीएेवजी न्यायालयात घटस्फाेटाचा दावा दाखल केल्याने सागरे कुटुंबीयांवर जातपंचायतीच्या हुकमावरून समाजातून त्यांना बहिष्कृत करण्यात आले.

जातपंचायतीत मुलीच्या आजाेबा, मामांचा सहभाग
जातपंचायतीचे पाटील व पंच म्हणून मुलीचे आजाेबा, मामा हे काम पाहत असून त्यांनीही सदर मुलीस बहिष्कृत केल्याने त्यांच्यावरही पाेलिसांनी सामाजिक बहिष्कार विराेधी कायद्याचे कलम ५ व ६ आणि भादंवि कलम १२० बी नुसार गुन्हा दाखल केला आहे. सागरे कुटुंबीयांशी कुणी संबंध ठेवू नये, ठेवल्यास त्यांना वाळीत टाकू असे फर्मान जातपंचायतीने काढले आहे. त्यामुळे सागरे कुटुंबीयांना समाजातील, नात्यातील सुख-दु:खाच्या प्रसंगात सहभागी करून घेतले जात नाही.

बातम्या आणखी आहेत...