आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन खरात यांची टीका:शिमग्याआधी पवारांच्या नावाने बोंबलू नका, सचिन खरात यांची आ. पडळकर यांच्यावर टीका

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘मंत्रिमंडळ विस्तार अजून लांब आहे. गोपीचंद पडळकर, शिमग्याच्या अगोदरच शरद पवार यांच्याबद्दल बोंबलायला सुरुवात करू नका,’ अशी टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर केली.

पवार कुटुंबीयांच्या रेशन कार्डाची चौकशी करावी, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबीयांवर हल्लाबोल केला होता. त्यावर रिपाइं खरात गटाने पडळकर यांचा समाचार घेतला. सचिन खरात यांनी पडळकर यांच्यावर टीका करताना म्हटले की, गोपीचंद पडळकर, ‘तुम्हाला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून तुम्ही दु:खी आहात हे स्पष्टपणे दिसून येत आहे. परंतु काही मालक दोन तऱ्हेचे प्राणी पाळतात. एक चावायला आणि दुसरा फक्त जोरजोरात ओरडायला. त्यामुळे तुम्हाला फक्त जोरात ओरडण्यासच ठेवले आहे. मंत्रिमंडळात तुमचा समावेश झाला नाही म्हणून पवार साहेब यांच्यावर ओरडू लागला आहात. पवार घराण्याच्या रेशन कार्डच्या चौकशीची मागणी करत आहात. परंतु तुम्ही आटपाडीमध्ये किती अाध्यात्मिक काम केले आहे याची नोंद तुमच्या रेशन कार्डावर झाली असेल ते जनतेपुढे मांडा. त्यामुळे पडळकर, मंत्रिमंडळ विस्तार लांब आहे.

शिमग्याच्या अगोदर शरद पवार यांच्याबद्दल बोंबलायला सुरुवात करू नका,’ असा हल्लाबोल सचिन खरात यांनी पडळकर यांच्यावर केला. संपूर्ण पवार कुटुंबाच्या रेशन कार्डावर असलेल्या व्यक्तींची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी गोपीचंद पडळकरांनी केली होती.

बातम्या आणखी आहेत...