आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वोत्तम टिपा:उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी नव्या वर्षात हे करा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूने आपल्या वाचकांसाठी २०२२च्या उपयोगी आणि सर्वोत्कृष्ट मॅनेजमेंट टिप्स जाहीर केल्या आहेत. त्यांना गेल्या वर्षीही चांगली पसंती मिळाली होती. २०२३ मध्येही या टिप्स वर्षभर कामी येतील असे तज्ज्ञ सांगतात.

बोलण्यात सोप्या शब्दांचा वापर करा संस्थेत लोक कोणत्या प्रकारच्या भाषेचा वापर करतात. नोकरीचे तपशील देताना, रंग, पंथ, वय, अपंगत्व या कारणांमुळे एचआर नकळतपणे उमेदवाराला अर्ज करण्यापासून रोखत तर नाही. संस्थेचा एक शब्दकोश बनवला जाऊ शकतो.

वातावरण शांत राखण्याचा प्रयत्न करा आपल्या कर्मचाऱ्यांना शांत वातावरण देण्याचा प्रयत्न करा. नो ई-मेल फ्रायडे’ किवंा ‘नो मिटिंग ट्यूसडे’ सुरू करा. तुम्हाला यामुळे त्रास होतो का? असे लोकांना विचारा. मात्र एकमेकांवर राग करत किंवा दोष देत बसू नये.

आपल्या टीमला प्रोत्साहन देत चला मॅनेजरच्या तोंडुन कौतुकाचे दोन शब्द ऐकल्याने कर्मचारी उत्साहाने काम करू लागतात आणि उत्पादन वाढते. कौतुक करण्याआधी मॅनेजरला त्या कामाचं महत्त्व आणि ते कर्मचाऱ्यांने कसं पूर्ण केले, हे माहित असावं.

नोकरी सुटली तर असे पुढे जा.. नोकरी गेल्याने प्रचंड दु:ख होते. पण आत्मविश्वास आणि धीर ठेवा. फक्त नोकरी शोधण्याचे कामच करू नका. दिवसातील काही तास नोकरी शोधण्यासाठी ठेवा. लोकांना सांगा. तुमची परिस्थिती जाणून लोक मदत करतात.

प्रत्येक आवड योग्य असेल असे नाही तुम्ही जेव्हा कामाविषयी विचार करू लागता, तेव्हा सर्व गोष्टींचा विचार करा. या गाेष्टी तुम्हाला कठीण जाऊ शकतात. पण या गोष्टी तुम्हाला आव्हानात्मक वाटू लागतात आणि आकर्षित करतात. त्यामुळे योग्य सवय लावा.

बातम्या आणखी आहेत...