आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांजराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने डॉक्टरला मारहाण:पुण्यामध्ये क्लिनिकचीही केली तोडफोड

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मांजराचा उपाचारा दरम्यान मृत्यू झाल्याने एका महिलेसह चार व्यक्तींनी डॉक्टरला मारहाण तसेच क्लिनिकची तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

काय आहे प्रकरण?

याप्रकरणी डाॅ.रामनाथ येण्याबापु ढगे (वय-51,रा.हडपसर,पुणे) यांनी एक महिला व चार अनाेळखी इसम यांचे विराेधात हडपसर पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार10 डिसेंबरला रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास तक्रारदार यांचे हडपसर भागातील डाॅग अ‍ॅण्ड कॅट क्लीनिक येथे घडला आहे. आराेपींनी उपचारकामी आणलेले मांजराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे कारणावरुन डाॅक्टरांना शिवीगाळ करुन मांजर कसे झाेपले आता तुला झाेपवताे, तुझा दवाखाना बंद करताे अशी धमकी दिली.

तसेच डॉक्टरांना खाली पाडुन लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने त्यांच्या उजव्या पायाचे घाेटयाला गंभीर जखम करुन फ्रॅक्चर करण्यात आले. त्यानंतर डाॅक्टरांचे क्लीनीक मधील वस्तुंची ताेडफाेड करुन आराेपी पसार झाले आहे. या घटनेचे चित्रिकरण क्लिनिक मधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून त्याआधारे पोलिस आराेपींचा शाेध घेत आहे. याबाबत पुढील तपास हडपसर पोलिस करत आहे.

6 दिवसांच्या अर्भकाची नदीपात्रात विल्हेवाट

पुण्यातील संगमवाडी परिसरात बाेट क्लबच्या विरुध्द बाजुस मुळा नदी पात्रात दहा डिसेंबर राेजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पोलिसांनी सहा दिवसांचे पुरुष जातीचे एक मृत अवस्थेत अर्भक मिळून आले. काेणीतरी अज्ञात पालकाने अपत्य लपवणुक करण्याच्या उद्देशाने सहा दिवसांच्या अर्भकाची विल्हेवाटकरण्याचे उद्देशाने त्यास नदीपात्रात टाकुन दिले आहे. याप्रकरणी पालकां विराेधात पोलिस शिपाई मनाेज गंगाधर दिवे (वय-36) यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पुढील तपास खडकी पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...