आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टर्स डे:'नॅशनल डॉक्टर डे' च्या दिवशीची डॉक्टर दांपत्याची आत्महत्या, घटनेमुळे पुण्यात खळबळ

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • घटनेची माहिती मिळाल्यांनतर वानवडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली

‘नॅशनल डॉक्टर डे’च्या दिवशीच पुण्यातील डॉक्टर दाम्पत्याने राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. आज सकाळी हा सदरील प्रकार उघडकीस आल्यानंतर वानवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. निखिल दत्तात्रय शेंडकर (वय 27) आणि पत्नी अंकिता निखिल शेंडकर (वय 26) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी येथील आझादनगर भागात हे दोघे राहत होते. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होते. त्यांच्यात किरकोळ कारणावरून सतत वाद होत असत. काल (बुधवारी) निखिल काम संपल्यावर घरी येत असताना दोघांचे फोनवर वाद झाले. हे वाद झाल्यानंतर अंकिताने रागात फोन ठेवला. त्यानंतर निखिल नेहमीप्रमाणे घरी आला. त्यावेळी फोनवर वाद झाल्यानंतर पत्नीनं गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.

यामुळे त्याला प्रचंड धक्का बसला होता . या नैराश्यातून निखिलनेही आज सकाळी घरात गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यांनतर वानवडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...