आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:ईडीकडे फक्त आमच्याच नेत्यांचे पत्ते आहेत का : शिवसेना खासदार संजय राऊत

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांची ईडीकडून चौकशी होत आहे. ईडीकडे फक्त आमच्याच नेत्यांचे पत्ते आहेत का? आमच्याकडेही त्यांचे पत्ते आहेत. ते आम्ही चौकशीसाठी देऊ, असे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. पिंपरी-चिंचवड आणि भोसरी विधानसभा आढावा बैठकीसाठी संजय राऊत शुक्रवारी आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, इथे पण अनेक घोटाळे आहेत. मात्र, इथे ईडी किंवा सीबीआय जात नाही. ईडीकडे फक्त खडसे, देशमुख, सरनाईक यांचेच पत्ते आहेत का, असा सवालही त्यांनी केला.

सहकार राज्याचा विषय
सहकार खाते केंद्रात काढून काही कार्यक्रम करायचा विचार असेल तर आम्हीही कार्यक्रम करू. खरे तर सहकार हा राज्याचा विषय, पण तो केंद्राशी जोडला आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणण्यासाठी केवळ केंद्रात सहकार खाते निर्माण केले आहे का, असा सवालही त्यांनी केला. नारायण राणे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी अनेक पदे भूषवली. त्यांची राजकीय गरुडझेप पाहिली आहे. हे पाहता त्यांना मिळालेले खाते कमकुवत आहे. मोठे खाते मिळाले असते तर महाराष्ट्र म्हणून गौरव वाटला असता. ते चांगले काम करतील असा विश्वास आहे, असेही राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...