आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या गाेपाळ तिवारींचा टीका:म्हणाले - भाजपची जनतेप्रती दगाबाजी शहांना दिसत नाही का?

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि भाजपने मागील निवडणुकीत जनतेस दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नाही. दिवसेंदिवस महागाई, बेराेजगारी, महिला अत्याचार वाढत असून भाजपने जनतेप्रती केलेली दगाबाजी अमित शहांना दिसत नाही का? असा टाेला मंगळवारी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गाेपाळ तिवारी यांनी पत्रकारांशी बाेलताना लगावला.

तिवारी म्हणाले, काळे धन परत आणू, प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख देऊ, दरवर्षी दाेन काेटी तरुणांना राेजगार देऊ, शेतकऱ्यांना कर्ज माफी देवू, भ्रष्टाचार बंद करू अशी अनेक प्रकारची आश्वासने भाजपने जनतेस दिली हाेती. परंतु, या घाेषणांचा माेदी-शाह या जाेडगळीस विसर पडला असून जीएसटी व नाेटबंदीच्या अपेक्षित परिणामांसाठी त्यांनी मागितलेला अवधी ही उलटून गेलेला आहे.

तिवारी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी दिल्लीतील लाल किल्लयावरून देशवासीयांना केलेल्या भाषणातील अपेक्षापूर्तींच्या मुदती देखील उलटून गेल्या आहे. परंतु जनतेच्या पदरी केवळ निराशाच पडली असून भाजपने जनतेप्रती केलेल्या दगाबाजीचे हे रूप आहे.

पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रातील राजकीय घडामाेडींवर लक्ष्य ठेऊन ‘महाराष्ट्राच्या सत्तेचा’ सुरत- आसाममध्ये बाजार मांडून, घाेडेबाजार करत, असंवैधानिक पद्धतीने व लाेकशाही मूल्यांना तिलांजली देत, केंद्रीय सत्तेचा गैरवापर करुन महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे स्थिर सरकार पाडण्याचे काम भाजपने दगाबाजीने केले आहे.

तिवारी पुढे म्हणाले की, राज्यपालांना हाताशी धरून राज्यातील सत्ता उलथविण्याचे नाट्य आज ही सर्वाच्च न्यायालयात कायदेशीर वैध ठरलेले नाही. परंतु ‘चाेराच्या उलट्या बाेंबा’ या उक्तीने शिरजाेरपणे व साेयीने अर्थ लावून शिवसेनसच दगाबाज संबाेधून व त्यांच्यावर बदनामीचा शिक्कामाेर्तब करण्याचा डाव अमित शाह साधत आहेक. परंतु यानिमित्ताने भाजपने जनतेप्रती केलेली दगाबाजी अमित शाह यांना दिसत व स्मरत नाही का? असा उपराेधिक प्रश्न गाेपाळ तिवारी यांनी उपस्थित केला आहे.

बातम्या आणखी आहेत...