आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Doll Hanged After Watching Horror Movie; The Eight year old Boy Then Took The Gallows, The Incident At Thergaon In Pune; Mother Was Busy At Home

पुणे:हॉरर फिल्म पाहून बाहुलीला दिली फाशी; नंतर आठवर्षीय मुलाने घेतला गळफास, पुण्याच्या थेरगाव येथील घटना

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आई घरातील कामात व्यग्र असताना आठ वर्षांचा चिमुरडा ‘कमल’ बाहुलीशी खेळत होता. त्याने एखाद्या कैद्याला फाशी देण्यापूर्वी चेहरा झाकतात अगदी तसाच त्याने बाहुलीच्या तोंडावर कपडा बांधला होता. बाहुली आपल्याला सोडून गेल्याचा समज झाल्यानंतर कमलनेही स्वतःच्या गळ्याभोवती दोरी बांधून गळफास घेतला. कमलला मोबाइलवर हॉरर फिल्म पाहण्याची सवय होती. त्यामुळेच त्याच्याकडून असे कृत्य झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना थेरगाव येथे घडली.

कमल खेम साऊद (८, रा. सोळा नंबर बस स्टॉप, थेरगाव, पुणे) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास कमल बाहुलीसोबत खेळत होता. जवळच लहान भाऊ आणि बहिणदेखील खेळत होती. आई कामात व्यग्र होती. वडील बाहेर गेले होते. खेळताना कमलने बाहुलीच्या तोंडावर कापड गुंडाळून तिला फाशी दिली. बाहुली मृत झाल्याचा समज झाल्यानंतर त्याने खिडकीला बांधलेल्या दोरीने गळफास घेतला. चौकशीत कमल मोबाइलवर हॉरर फिल्म पाहत असल्याचे समोर आले. हॉरर फिल्म पाहूनच त्याने हे कृत्य केले असावे, असे पोलिसांनी सांगितले.

पोटचा गोळा गेल्याने आईने फोडला हंबरडा
मृत कमल दोन्ही मुलांपेक्षा मोठा होता. आई कामात असताना तोच लहान भावंडांना सांभाळत होता. रविवारी दुपारी कमलच्या आईने खोलीत डोकावून पाहिले, तेव्हा बाहुलीचे तोंड बांधून तिला गळफास दिल्याचे व पोटचा गोळा फासावर लटकलेले भीतिदायक चित्र पाहून तिने हंबरडा फोडला. कमल अशी थट्टा करून नको म्हणत आईने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.

बातम्या आणखी आहेत...