आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊनमध्ये चकीत करणारा खुलासा:पुण्यात गेल्या 15 महिन्यात पुरुषांच्या छळाची प्रकरणे 6 पटींनी वाढली; पत्नींवर मारहाण आणि मानसिक छळांचे आरोप

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यात 2 वर्षांपूर्वी स्थापन झाले ट्रस्ट सेल

राज्यात कोरोनामुळे गेल्या दिड वर्षांपासून जास्तीत जास्त लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत. या दरम्यान समोर आले की, घरी 24 तास सोबत राहत असल्याने पती-पत्नीमध्ये भांडणे वाढत आहेत. मात्र चकीत करणारी गोष्ट म्हणजे पतींचा जास्त छळ झाला आहे. पुण्याच्या ट्रस्ट सेलने हा दावा केला आहे की, लॉकडाऊन दरम्यान घरांमध्ये राहणाऱ्या पतींचा लॉकडाऊनमुळे पहिल्याच्या तुलनेत पत्नींकडून जास्त छळ झाला आहे.

लॉकडाऊनमध्ये पतीच्या छळाची प्रकरणे 6 टक्यांनी वाढली
ट्रस्ट सेलच्या प्रमुख सुजाता शानमे यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या आधीच्या एक वर्षादरम्यान 1283 लोकांनी पुण्याच्या ट्रस्ट सेलमध्ये कौटुंबिक वादाची तक्रार दाखल केली होती. यामध्ये पत्नींची संख्या 791 होती, तर पतीची संख्या केवळ 252 होती.

मात्र लॉकडाऊन दरम्यान, म्हणजेच गेल्या 15 महिन्यांपासून हा आकडा वाढून 3,075 पर्यंत पोहोचला आहे. यामध्ये पतींविरोधात तक्रार करणाऱ्या महिलांची संख्या 1540 आहे. तर पुरुषांची संख्या 1535 आहे. म्हणजेच तक्रार करणाऱ्या पुरुषांची संख्या लॉकडाऊनच्या पहिले एक वर्षांच्या तुलनेत 6 पटींनी वाढली आहे.

सुजाता यांच्यानुसार, गेल्या दीड वर्षांच्या दरम्यान घरगुती कलहाच्या तीन हजारांपेक्षा जास्त केस दाखल झाल्या आहेत. यामध्ये जास्तीत जास्त केस मारहाण, शारीरिक आणि मानसिक छळाच्या आहेत. काही तक्रारींमध्ये हा दावाही करण्यात आला आहे की, त्यांच्या पत्नी भांडणे करुन मुलांना घेऊन आपल्या माहेरी गेल्या आहेत आणि आता त्या परत येत नाहीतेय.

घरात राहिल्यामुळे लोकांमध्ये वाढत आहे मानसिक तणाव
सुजाता यांनी सांगितले की, 24 तास बंद खोलीत राहत असल्यामुळे लोकांमध्ये मानसिक तणाव वाढत आहे. पती-पत्नी, छोट्या-छोट्या गोष्टींमुळे भाडत आहेत. आम्ही अशा लोकांना येथे बोलावून किंवा मग ऑनलाइन माध्यमातून त्यांची काउंसिलिंग करुन समजूत घालण्याचा प्रयत्न करतो.

पुण्यात 2 वर्षांपूर्वी स्थापन झाले ट्रस्ट सेल
पुण्याच्या ट्रस्ट सेलची स्थापना 9 जानेवारी 2019 ला झाली होती. याचा हेतू लहान मुले, वयस्कर आणि महिलांना शक्य ती मदत करणे आहे. सेलसंबंधीत पोलिसकर्मचारी घरगुती हिंसा, कलहासंबंधीत प्रकरणांमध्ये महिला किंवा पुरुषांची काउंसिलिंगही करतात.

बातम्या आणखी आहेत...