आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघरगुती वादातून पतीच्या सततच्या टोमण्यामुळे चक्क पत्नीच्या हदयात ब्लॉकेज तयार झाल्याचे पत्नी अन् माहेरच्या लोकांचे म्हणणे आहे. धनकवडी परिसरातील हा प्रकार असून सासरच्या इतर नातेवाईकांनी विवाहित महिलेला मारहाण करीत तिचा शारिरीक व मानसिक छळ केल्याचे तक्रारीत सांगण्यात आले. याबाबतची माहिती पाेलीसांनी मंगळवारी दिली.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, ही घटना जुलै 2021 ते मार्च 2023 कालावधीत घडली आहे. याप्रकरणी पती प्रतीक चोथे, सासरे दिलीप चोथे (वय- 65, रा.अहमदनगर) यांच्यासह अन्य चार महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रतीक चोथे यांच्या 29 वर्षीय पत्नी आरती यांनी सहकानगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व या प्रकरणातील फिर्यादीनुसार, आरती चाेथे आणि प्रतीक चाेथे यांचे 2021 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर सासरी नांदताना आरतीला पतीकडून हीन दर्जाची वागणूक दिली जात होती. ''तुला अमुक-तमूक येत नाही.'' अशाप्रकारे टोमणे मारत तिचा छळ केला जात होता. त्याशिवाय इतर नातेवाईकांकडूनही आरतीला मारहाण करीत शारिरीक व मानिसक छळ सातत्याने करण्यात आला.
या सर्व प्रकारामुळे आरतीच्या हदयात ब्लॉकेज तयार झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नेहमीच्या छळास कंटाळून तिने सहकानगर पोलिस ठाण्यात धाव घेत पतीसह सासरच्या नातेवाईकांविराेधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस नाईक एस यादव तपास करीत आहेत.
जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
मार्केटयार्ड भाजी मंडई, पुणे येथील परीसरात गाळयाच्या बाजुला मोकळ्या जागेत काही इसम बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी छापा टाकून बेकायदेशीर मटका जुगार पैसे लावुन खेळत असलेल्या 11 इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडून मटका जुगारातील रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकुण 17 हजार 550 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत 11 इसमांविरूध्द मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.