आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे:उगाच ऊर्जा वाया घालवू नका; आम्ही पण तुमचे बाप आहोत, चंद्रकांत पाटलांची अजित पवारांवर शेलक्या शब्दांत टीका

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुणेकरांच्या समस्या शासन दरबारी मांडणार : चंद्रकांत पाटील

पुणे महापालिकेतील सत्तेच्या हस्तांतराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जर काही वेगळी स्वप्नं पडत असतील तर यासंदर्भात त्यांनी ऊर्जा वाया घालवू नये. आम्ही पण तुमचे बाप आहोत, अशा शेलक्या शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. कोथरूड येथे भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पार पडल्या, या वेळी पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले, पुणे महानगरपालिकेत शुक्रवारी झालेल्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १६ पैकी ११ ठिकाणी भाजपचे सदस्य विजयी झाले. एक जागा टॉसवर काँग्रेसकडे गेली असून अन्य चार जागी राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली. या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काहीतरी जादू करून सर्व जागांवर भाजपचे अध्यक्ष झाले पाहिजे होते. मात्र, तसे झाले नाही. पण अजित पवार यांना पुढची काहीतरी स्वप्नं पडत आहेत. त्यांनी जास्त ऊर्जा वाया घालवू नये. आम्हीदेखील त्यांचे बाप आहोत, अशा शब्दांत पाटील यांनी अजित पवारांना यांना टोला लगावला.

पुणेकरांच्या समस्या शासन दरबारी मांडणार
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मतदारसंघात नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. तर गेल्या आठवड्यात मतदारसंघातील विविध सोसायट्यांतील नागरिकांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर आयुक्तांची भेट घेऊन तोडगा काढणार असल्याचेही सांगितले. तसेच आगामी काळात मतदारसंघातील कोरोनावर यशस्वीपणे मात केलेल्यांसाठी एक काउन्सेलिंग शिबिर राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.