आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाभोलकर हत्या प्रकरण:अंदुरे, कळसकर यांनीच डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या; प्रत्यक्षदर्शीची कोर्टात साक्ष, गोळ्या झाडल्या तेव्हा साक्षीदार घटनास्थळाजवळ होता

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याचा आरोप निश्चित केलेले सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना शनिवारी (ता. १९) प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले आहे. अंदुरे आणि कळसकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर दोघे तेथून फरार झाले, अशी साक्ष या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने दिली.

विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात ‘सनातन’ संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कर्मचाऱ्याची शनिवारी साक्ष झाली. त्यांनी डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना ओळखले आहे. त्यामुळे त्यांनी न्यायालयात दिलेली ही साक्ष खटल्यात महत्त्वाची ठरणार आहे. डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या करण्यात आली होती. घटनेच्या दिवशी साक्षीदार पुलावर साफसफाई करत होते. त्याची महिला सहकारी त्यावेळी तेथे कामावर होती. सर्व घटनाक्रम साक्षीदारांनी साक्षीदरम्यान न्यायालयास सांगितला. तसेच अंदुरे आणि कळसकर यांनीच डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे न्यायालयास सांगितले.

बातम्या आणखी आहेत...