आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गदिमा पुरस्कार जाहीर:डाॅ. मोहन आगाशे यांना गदिमा पुरस्कार जाहीर

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते डाॅ. मोहन आगाशे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध चित्रकार साधना बहुळकर यांना विद्याताई माडगूळकर स्मृती गृहिणी सखी सचिव पुरस्कार जाहीर झाला आहे. दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे चैत्रबन पुरस्काराचे तर, युवा गायिका योगिता गोडबोले या विद्या प्रज्ञा पुरस्काराच्या मानकरी आहेत. ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून १४ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सायंकाळी ५ वाजता पुरस्कार प्रदान होतील असे सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...