आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पीसीसीओईआर'ला नोडल पुरस्कार:डॉ. सुदर्शन बोबडे यांचा उत्कृष्ट समन्वयक म्हणून गौरव

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅड रिसर्च (पीसीसीओईआर) या अभियांत्रिकी महविद्यालयाला अखिल भारतीय स्तरावरील मानाचा सर्वोत्कृष्ट असा सन २०२२ चा ‘आय.आय.आर.एस. सर्वोत्कृष्ट नोडल केंद्र पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला. हा भारत सरकार, अंतराळ विभाग, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), भारतीय सुदूर संवेदन संस्था यांच्या वतीने देण्यात येतो.

डेहराडून येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. आर.पी. सिंग, संचालक, आय.आय.आर.एसचे संचालक डॉ. कलाचंद सैन, डॉ. रणजित सिन्हा, डॉ. एस.के. श्रीवास्तव आदींच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. सुदर्शन बोबडे यांनी पुरस्कार स्विकारला. पीसीइटीच्या सर्व शाखांमध्ये विद्यार्थी तसेच प्राध्यापकांना शिक्षण आणि संशोधनासाठी अनुकूल वातावरण आहे. ट्रस्ट नेहमी संशोधनासाठी भक्कम पाठबळ देत आहे. या पुरस्काराने पीसीओईआरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे, अशी प्रतिक्रिया पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी दिली. देशभरात कार्यरत असणाऱ्या ३२१४ दूरस्थ शिक्षण कार्यक्रम केंद्रांमधून पीसीसीईओआरची निवड केले आहे.

बोबडेंनी शिक्षण सर्वदूर पोहोचवले भारतीय सुदूर संवेदन संस्था (आयआयआरएस) आउटरीच नेटवर्क समन्वयक हा पुरस्कार पीसीसीओईआरचे सहायोगी प्राध्यापक डॉ. सुदर्शन बोबडे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार रिमोट सेन्सिंग अॅड जीआयएसचा (आरएस अॅड जीआयएस) सर्व समाजातील स्तरावर प्रचार केला. समाज उपयोगी उपक्रमात सुदूर संवेदन व त्याचा वापर उत्कृष्टरित्या केल्याबद्दल, तसेच विद्यार्थ्यांसाठी आयआयआरएस दूरस्थ शिक्षण कार्यक्रम पोहचवण्याकरता दिला. सर्वाच्या मार्गदर्शन, पाठबळाने यश मिळाल्याचे डॉ. बोबडे म्हणाले.