आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:डॉ. थॉमस यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मिसाइल वुमन’ ही ओळख असलेल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वैमानिक प्रणालीच्या महासंचालिका आणि ‘अग्नी-४ व ५’ क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या यशाच्या शिल्पकार डॉ. टेसी थॉमस यांना या वर्षी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवले जाणार आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात सोमवारी (दि. १ ऑगस्ट) लोकमान्यांच्या पुण्यतिथी सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण होईल.

टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक तसेच उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी शुक्रवारी या पुरस्काराची घोषणा केली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारतीय संरक्षण क्षेत्राला बळ देणारे संशोधन डॉ. टेसी थॉमस यांनी केले आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये, असे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप डॉ. दीपक टिळक यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...