आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुदान:डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा 2 लाख 88 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ, सवलतीचे 56 कोटी खात्यावर जमा

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पमुदत पीक कर्ज घेऊन मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा 2022-23 या वर्षात जिल्ह्यातील 2 लाख 88 हजार 917 शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला असून त्यांच्या खात्यावर व्याज सवलतीपोटी 56 कोटी 31 लाख 77 हजार 25 रुपये जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (पुणे ग्रामीण) प्रकाश जगताप यांनी शनिवारी दिली आहे.

काय आहे ही योजना?

तीन लाख रुपयांपर्यंत अल्पमुदत कर्ज घेऊन विहीत मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 टक्के व्याज सवलत देण्याची डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सर्व राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँकातून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवण्यात येते.

शेतकऱ्यांच्या खाती निधी

या योजनेंतर्गत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (पुणे ग्रामीण) यांच्यामार्फत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्राप्त तसेच शासनाकडून प्राप्त निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 60 हजार 254 शेतकऱ्यांना 12 कोटी 91 लाख 69 हजार 939 रुपये आणि राज्य शासनाकडून प्राप्त निधीतून 2 लाख 28 हजार 663 शेतकऱ्यांना 44 कोटी 40 लाख 7 हजार 86 रुपये इतकी व्याज सवलतीची रक्कम अदा करण्यात आली आहे.