आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Dr. Ramchandra Dekhne Memorial Award Announced; Kirtankar Award To Pramod Jagtap; Folk Art Award To Raghuveer Khedkar | Pune News

पुरस्कारांची घोषणा:डॉ. रामचंद्र देखणे स्मृती कीर्तनकार पुरस्कार प्रमोद जगताप यांना; लोककला पुरस्कार रघुवीर खेडकर यांना जाहीर

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. रामचंद्र देखणे यांचे साहित्य, लोककला, वारकरी संप्रदाय या क्षेत्रांमधील योगदान लक्षात घेऊन तसेच त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून संत विचार प्रबोधिनीतर्फे ‘डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार 2023' प्रदान करण्यात येणार आहेत. कीर्तनकार' हा पुरस्कार वारकरी कीर्तनकार प्रमोद महाराज जगताप यांना तर लोककला' हा पुरस्कार प्रसिद्ध लोककलावंत रघुवीर खेडकर यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. भावार्थ देखणे यांनी गुरुवारी येथे दिली.

डॉ. देखणे हे साहित्यिक, संत व लोकवाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक तसेच कीर्तनकार, व्याख्याते, प्रवचनकार आणि बहुरूपी भारूडकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी संतसाहित्य, लोकसाहित्य, ललित, संशोधनात्मक व चिंतनात्मक अशी ५२ पुस्तके लिहिली. मराठीतील सर्वच प्रसिद्ध वृत्तपत्रांमध्ये व नियतकालिकांमध्ये तीन हजाराहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. महाराष्ट्र तसेच अमेरिका, दुबई येथील विविध व्याख्यानमालांमधून त्यांनी 3500हून अधिक व्याख्याने दिली. डॉ. देखणे हे निष्णात वारकरी होते.

‘संत विचार प्रबोधिनी' दिंडी घेऊन अनेक वर्षे त्यांनी पंढरपूरची वारी केली. 26 सप्टेंबर 2022 रोजी त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने सांस्कृतिक व साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली. साहित्य क्षेत्रातील व वारकरी सांप्रदायातील त्यांच्या योगदानाप्रित्यर्थ त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हे पुरस्कार देण्यात येणार आहेत, असे डॉ. भावार्थ देखणे यांनी सांगितले.

पुरस्कार वितरण समारंभ १२ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता गरवारे कॉलेज सभागृह, कर्वे रोड येथे होणार आहे. पुरस्कार वितरण प्रसिद्ध प्रवचनकार चैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या हस्ते होणार आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे आहेत