आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:ओबीसींच्या आरक्षणासंबंधी अंतरिम अहवालाचा मसुदा अंतिम टप्प्यात, मागासवर्गीय आयोग सोमवारी सादर करणार अहवाल

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य मागासवर्ग आयोगाने ओबीसी आरक्षणासंबंधीच्या अंतरिम अहवालाचा मसुदा तयार केला असून तो अंतिम टप्प्यात आला आहे. शुक्रवारी पुण्यातील व्हीआयपी सर्किट हाऊस येथे आयोगाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होऊन तो राज्य सरकारला ७ फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांची प्रकृती ठीक नसल्याने ते आयोगाच्या बैठकीस मुंबई येथून ऑनलाइन उपस्थित होते. तर, आयोगाचे ८ सदस्य प्रत्यक्ष बैठकीत उपस्थित राहून त्यांनी सरकारने दिलेल्या इंपेरिकल डाटासह इतर महत्वपूर्ण मुद्द्यावर चर्चा केली.

आयोगाचे सदस्य अॅड. बी. एल. सागर, किल्लारीकर म्हणाले, मागासवर्ग आयोगाकडून अहवाल अंतिम करण्याचे काम शनिवारी पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर येत्या सोमवारी मुख्य सचिवांकडे अहवाल सादर केला जाईल. राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेल्या इतर मागासवर्गाच्या माहितीची छाननी करण्याचे काम सुरू असून वेळेअभावी शुक्रवारी ते काम थांबवण्यात आले आहे. शनिवारी पुन्हा बैठक होणार आहे. दुपारपर्यंत अहवालाला अंतिम स्वरूप दिले जाईल. त्यानंतर येत्या सोमवारी अहवाल सादर केला जाणार आहे. न्या. चंद्रलाल मेश्राम यांच्यानुसार, ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले नसून स्थगित केले आहे. ते करताना ट्रिपल टेस्ट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दोन टेस्ट पूर्ण केल्या आहेत. तिसरी टेस्ट म्हणजे इम्पिरिकल डेटा जमा करणे आहे. हा डेटा एक-दोन महिन्यांत पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळेच अंतरिम अहवाल देण्याची विनंती राज्य सरकारने आयोगाला केली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयानेदेखील सरकारकडील डेटा आयोगाला द्यावा. त्यावर आयोग अभ्यास करून निर्णय देईल, असे हे निर्देश होते.

आयोगाच्या आदेशाबाबत अहवालात उल्लेख
अध्यक्षांनी तयार केलेल्या ड्राफ्टवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यात काही सुधारणा करण्यात आल्या. आम्ही दिलेल्या अहवालानुसार राज्य सरकार, निवडणूक आयोगाला ओबीसी आरक्षणाबाबत आदेश द्यावे लागणार आहेत. ते कशा प्रकारचे असावेत किंवा कशा स्वरूपाचे असतील याचा उल्लेख संक्षिप्त स्वरूपात अहवालात करण्यात आला असल्याचे न्या. चंद्रलाल मेश्राम यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...