आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानी गुप्तचरांच्या हस्तकांना भारतातून गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपावरून पुण्यातील संरक्षण विभागामधील शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना अटक झाली आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयाने 15 मेपर्यंत एटीएसची कोठडी सुनावली आहे.
तपासात हे आढळले
प्रदीप कुरुलकर यांच्या ईमेल देवाण - घेवाणीत आढळलेले संशयास्पद ईमेल पाकिस्तानातील असल्याचे तपासातून पुढे आले आहे. तसेच त्यांच्या सोशल मीडियाद्वारे फोटो, व्हिडिओ आणि फाईल्स शेअर झाल्याचे दहशतवाद विरोधी पथकाने कोर्टात सांगितले. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आज डॉ. कुरुलकर यांना १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
फाॅरेन्सिकद्वारे तपासणी
डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या मोबाइल आणि अन्य उपकरणातून डिलीट झालेला मजकूर फॉरेन्सिककडून प्राप्त झाला आहे. फॉरेन्सिक अहवाल आज प्राप्त झाला असून त्याचे विश्लेषण करण्याचे बाकी आहे. कुरुलकर हे सहा देशात शासकीय कामासाठी गेले होते. ते तिथे कोणा कोणाला भेटले, त्यांना डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये भेटायला आलेल्या महिला कोण, याचा तपास करायचा आहे, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसांकडून कुरुलकर यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करत प्रमोद कुरुलकर यांना पुन्हा पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोप संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर आहे. त्यांना दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. या प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांची एटीएस कोठडीची मुदत आज (९ मे) संपली. त्यानंतर कुरुलकर यांना आज एटीएसच्या पथकाने पुण्यातील न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्यांना १५ मे पर्यंत एटीएस कोठडी सुनावली.
इलेक्ट्राॅनिक उपकरणे जप्त
कुरुलकर यांच्याकडून मोबाइल संच आणि लॅपटाॅप जप्त करण्यात आला आहे. कुरुलकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्राॅनिक उपकरणांचे तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. तपास अहवालातून अनेक धक्कादायक बाबी प्रकाशात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोण आहेत डॉ. कुरुलकर?
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.