आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:कुरुलकरांच्या कॉल लिस्टमधून संशयित अधिकाऱ्याचे नाव समोर, हनीट्रॅपमध्ये अडकल्याची शक्यता;  'ATS'चा तपास सुरू

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या एटीएस कोठडीची मुदत मंगळवारी (9 मे) संपलेली आहे. मात्र आता कुरलकर यांच्यासंदर्भात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे.

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, कुरलकर यांनी ब्रह्मोस, अग्नी आणि उपग्रहरोधी क्षेपणास्र यांची माहिती पाकिस्तानला पुरवली होती. विशेष म्हणजे केवळ अश्लील व्हिडीओ पाहण्याच्या लालसेपोटी कुरलकरने भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती उघड केली.

कारवाईसाठी जप्त केला

शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना शुक्रवारी पुण्यातील एटीएस कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले होते.
शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना शुक्रवारी पुण्यातील एटीएस कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले होते.

डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या सर्व बाबींचा भारतीय गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांकडून सध्या वेगाने तपास सुरू आहे. यात समोर आलेल्या आणखी एका माहितीनुसार, कुरुलकर यांच्या कॉल लिस्टमध्ये एका अधिकाऱ्याचे नाव समोर आले आहे. त्यानंतर एटीएसने त्या अधिकाऱ्याचा मोबाईल देखील पुढील कारवाईसाठी जप्त केला आहे.

धक्कादायक खुलासे

कुरुलकर यांची चौकशी तसेच त्यांच्याकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात मिळालेली माहिती एटीएसकडून न्यायालयात सादर केली जाणार आहे. एटीएसच्या तपासत अहवालातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अश्लील चॅटिंग वाढवली

समोर आलेल्या गोपनीय माहितीनुसार, डॉ. प्रदीप कुरुलकर यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्लॅन पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हकडून करण्यात आला होता. जारा दास गुप्ता असे पाकिस्तानी इंटेलिजन्सने आपले नाव सांगितले होते. कुरलकरांना आपल्या जाळ्यात ओढत अश्लील चॅटिंग वाढवली. कुरुलकर गेल्या वर्षी या महिलेला भेटण्यासाठी लंडनला जाणार होते. मात्र हा दौरा अचानक रद्द करावा लागला. मात्र दोघेही संपर्कात होते.

कुरुलकरांची चौकशी सुरू

एटीएसकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासाची माहिती न्यायालयात सादर केली जाणार आहे. कुरुलकरांची चौकशी तसेच त्यांनी तपासात दिलेली माहिती न्यायालयात सादर केली जाणार आहे. सुरक्षेचा भाग म्हणून कुरुलकर यांची गोपनीय ठिकाणी चौकशी सुरू आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणेतील (रिसर्च अँड ॲनलिसिस विंग- राॅ) अधिकाऱ्यांकडून कुरुलकरांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासात मिळालेली माहिती तसेच पुढील तपासाचे मुद्दे याबाबतचा अहवाल एटीएसकडून न्यायालयात सादर केला जाणार आहे.

गेस्ट हाऊसवर महिलांना बोलवायचे

डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुरलकर हे डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये अनेक महिलांना भेटत असत याबाबत माहिती समोर आली आहे. त्यांच्याकडे दोन पासपोर्ट असून त्यांनी शासकीय पासपोर्ट वापरून 5 ते 6 देशात दौरा केल्याचंही तपासात उघड झाले आहे. हा दौरा त्यांनी कशासाठी केला याबाबत अधिक तपास सुरु आहे.

परदेश दौऱ्याबाबत चौकशी सुरु

कुरुलकर हे परदेशात गेल्याचे चाैकशीत निदर्शनास आले आहे. त्यामुळे पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या लोकांना ते परदेशात भेटले का, याबाबत सखाेल तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा प्रकार 13 डिसेंबर 2022 ते 24 फेब्रुवारी 2023 यादरम्यान घडला. कुरुलकर यांनी शत्रू राष्ट्रांशी अनधिकृतरीत्या संवाद साधला. वाचा सविस्तर

कुरुलकर-RSS संबंधाबाबत आरोप

प्रदीप कुरुलकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याची चर्चा देखील सुरु आहे. त्यांच्याविरोधात पुण्यात आंदोलन झाले. अनेक राजकीय नेते सुद्धा त्यामुळे 'आरएसएस'वर आरोप करत आहेत. मात्र, यावर छगन भुजबळ यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले.

छगन भुजबळ म्हणाले की, 'आरएसएस' संघटनेवर कोणी देशद्रोहाचा आरोप करू शकत नाही. करू नये. मात्र, 'आरएसएस'मध्ये आहे, असे सांगून असे जे काही धंदे करणारे लोक आहेत त्यांच्यावर 'आरएसएस'ने नजर ठेवली पाहिजे. पोलिस, गुप्तहेर शाखांनी अधिक दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. कोण कधी, अशा काही हनी ट्रॅपमध्ये सापडेल सांगता येत नसल्याचेही ते म्हणाले. वाचा सविस्तर

संबंधित वृत्त

खुलासे उघड होणार?:डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांना आज पुण्यात न्यायालयात हजर करणार

पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप कुरुलकर यांच्या एटीएस कोठडीची मुदत मंगळवारी (९ मे) संपणार आहे. कुरुलकर यांना आज एटीएसच्या पथकाकडून पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.​​​​​​​ वाचा सविस्तर