आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनीट्रॅप:DRDO चे कुरुलकर परदेशामध्ये पाकिस्तानी एजंटला भेटल्याचा संशय, 'रॉ’च्या अधिकाऱ्यांनी पुण्यात येत घेतली माहिती

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना शुक्रवारी पुण्यातील एटीएस कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले. - Divya Marathi
शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना शुक्रवारी पुण्यातील एटीएस कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले.

DRDO पुण्याचे संचालक व तत्कालीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाॅब्लिस्ट (इंजिनिअर्स आर अँड डीई) दिघी येथील डायरेक्टर प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तान इंटेलिजन्स आॅपरेटिव्हला (पीआयआे) गाेपनीय माहिती पुरवल्याने त्यांना एटीएसने अटक केली होती. कुरुलकर हे परदेशात गेल्याचे चाैकशीत निदर्शनास आले आहे. त्यामुळे पाकिस्तान इंटेलिजन्स आॅपरेटिव्हच्या लोकांना ते परदेशात भेटले का, याबाबत सखाेल तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच रॉ या गुप्तचर संघटनेच्या अधिकाऱ्यांनी पुणे एटीएसमध्ये येऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे.

याबाबत दिल्ली येथील अॅडिशनल डायरेक्टर व्हिजिलन्स अँड सिक्युरिटी डीआरडीआे यांनी मुंबई एटीएसकडे तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार १३ डिसेंबर २०२२ ते २४ फेब्रुवारी २०२३ यादरम्यान घडला. कुरुलकर यांनी शत्रू राष्ट्रांशी अनधिकृतरीत्या संवाद साधला. याबाबतची माहिती डीआरडीआेला मिळाल्यानंतर त्यांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती केली व कुरुलकर वापरत असलेले २ माेबाइल, लॅपटाॅप, हार्डडिस्क जप्त करण्यात आली.

पाकसोबत सतत संपर्क
प्रदीप कुरुलकर हे डीआरडीओच्या संचालक पदावर असताना ते पाकिस्तान इंटेलिजन्स आॅपरेटिव्हसोबत सतत संपर्कात हाेते, अशी माहिती तपासात समोर आली आली होती. प्रदीप कुरुलकर वापरत असलेल्या उपकरणांची फाॅरेन्सिक तपासणी करण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण डीआरडीआेच्या अंतर्गत स्टँडिंग कमिटीकडे साेपवले आहे.