आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पुण्याच्या विद्यार्थ्यांनी बनवली ड्रायव्हरलेस कार!; चार्जिंगसाठी 4 तास, एका चार्जमध्ये 40 किमी प्रवास

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लेव्हल थ्री ऑटोनॉमीवर आधारित कारसाेबत एमआयटीचे विद्यार्थी.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या यंत्र अभियांत्रिकी (मेकॅनिकल) आणि अणुविद्युत आणि दूरसंचार (ई अ‍ँड टीसी) या अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी चालकरहित, स्वायत्त, विद्युत चारचाकी गाडी तयार केली आहे. या गाडीचे अनावरण बुधवारी संस्थेच्या प्रांगणात करण्यात आले. या वेळी माइर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या मेकॅनिकल विभागाचे प्रमुख व प्रकल्पाचे मुख्य मार्गदर्शक प्रा.डॉ. गणेश काकांडीकर उपस्थित होते.

यश केसकर, सुधांशू मणेरीकर, सौरभ डमकले, शुभांग कुलकर्णी, प्रत्यक्ष पांडे आणि प्रेरणा कोळीपाका या विद्यार्थांनी चालकविरहित, स्वायत्त, विद्युत, चारचाकी आणि चार आसनी बोल्ट-ऑन ऑटोनॉमस व्हेइकलचे प्रात्यक्षिक दाखवले. अशा प्रकारची ही देशातील पहिली गाडी असल्याचा दावा त्यांनी केला. ही गाडी लेव्हल थ्री ऑटोनॉमीवर आधारित असून यात बीएलडीसी मोटर्सचा वापर करण्यात आला आहे. या वाहनाला ऊर्जा देण्यासाठी लिथियम आयर्न बॅटरी वापरण्यात आली आहे.

एआय प्रणालीवर आधारित यंत्रणा
या वाहनाच्या थ्रॉटल, ब्रेक आणि स्टिअरिंग या ३ उपप्रणालींवर विशेष नियंत्रण ठेवण्यात यश मिळाले आहे. लीडर कॅमेरे, मायक्रोप्रोसेसर, स्वयंचलित क्रिया नियंत्रित करणारी यंत्रणा व विविध सेन्सर्ससह स्टिअरिंग, थ्रॉटल आणि ब्रेकवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. या वाहनांची पॉवर तीन किलोवॅट इतकी असून चार्जिंगसाठी चार तासांचा वेळ लागतो. त्यात ४० किलोमीटर प्रवास केला केला जाऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...