आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे वतीने पालखी मार्गावरील व आजूबाजूच्या परिसरात ड्रोन व ड्रोन सदृश्य कॅमेराने छायाचित्रण (शुटींग) करण्यास मनाई करणारा आदेश पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचेकडून लागू करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा आळंदी व देहुगाव येथुन पादुका प्रस्थान सोहळा व आषाढी वारी सालाबाद प्रमाणे संपन्न होणार आहे. दिनांक 17 ते 22/06/2022 रोजी पर्यंत असल्याने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे वतीने पालखी मार्गावरील व आजूबाजूच्या परिसरात ड्रोन व ड्रोन सदृश्य कॅमेराने छायाचित्रण ( शुटींग) करण्यास मनाई आदेश काढण्यात आला आहे. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचे कालावधीत आळंदी शहरात व देहुगाव येथे लाखो भाविक मंदिर तसेच मंदिर परिसरात एकच ठिकाणी एकवटलेले असतात. त्याचे काही लोक ड्रोनव्दारे किंवा ड्रोन सदृश्य कॅमेराव्दारे छायाचित्रण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याप्रमाणे आषाढी वारी करीता येणारे भाविक हे मुख्यतः ग्रामीण भागातील असुन त्यांना ड्रोन कॅमेरा ज्ञात नाही.
त्यामुळे अचानक ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आले तर भाविकांमध्ये अफवा पसरवुन गडबड गोंधळ उडुन चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 (1) (3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील आळंदी येथील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर व परिसर तसेच देहुगाव येथे ड्रोन् बंदी करण्यात आली आहे.
पालखी मार्गावर हातगाड्याना बंदी
पालखी मार्गावर फुल, फळ, खेळणी विक्रेते हातगाड्या लावुन जमीनीवर बसुन त्यांचा माल विक्री करीत असतात रस्त्याचे दोन्ही बाजुला त्यांचे बसण्यामुळे रस्त्याची रुंदी लहान होऊन पालखी प्रस्थान सोहळ्याचे वेळी त्याचा परिणाम जाणवतो. त्यामुळे मोठया प्रमाणात गर्दी होवुन चेंगराचेंगरी होण्याची दाट शक्यता असते. तसेच गर्दीचा फायदा घेवून गुन्हेगार प्रवृतीचे लोक आपला हेतू साध्य करतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो.
त्याअनुषंगाने पिंपरी चिंचवड हद्दीतील संपूर्ण पालखी मार्गावर 17 ते 23/06/2022 रोजी पर्यंत सुरक्षेच्या कारणास्तव पालखी मार्गाचे दोन्ही बाजुला फुल, फळ, खेळणी विक्रेते हातगाडीवाले यांना बसण्यापासुन प्रतिबंध करण्यात आला आहे.सदर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रावसाहेब जाधव यांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.