आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नारकोटिक्सची मोठी कारवाई:पुण्यात 20 कोटी रुपयांच्या ड्रग्ससह 5 जण ताब्यात, नारकोटिक्स विभाग बॉलिवूड कनेक्शनची चौकशी करत आहे

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चौकशीत समोर आले की, पुण्यात होणाऱ्या रेव पार्टीसाठी हे ड्रग्स मागवण्यात आले होते
  • आरोपींकडे 20 किलोग्राम मेफेड्रोन ड्रग्स सापडले, ज्याला 'म्याऊं म्याऊं'नावाने ओळखले जाते

नारकोटिक्स विभागाने गुरुवारी एका मोठ्या कारवाईत पुण्यातून 20 कोटी रुपयांचे मेफेड्रोन ड्रग्स जप्त केले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 5 आरोपींना अटक झाली आहे. नारकोटिक्स विभागाला संशय आहे की, या चौघांचा बॉलिवूडशी संबंध अशू शकतो. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासात समोर आले आहे की, पुणे आणि आसपासच्या परिसरात होणाऱ्या रेव पार्टीसाठी हे ड्रग्स मागवले होते.

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले की, अटक झालेले आरोपी उत्तर प्रदेशच्या नोएडा आणि महाराष्ट्रातील पुणे आणि जळगावचे आहेत. त्यांच्याजवळ 20 किलोग्राम मेफेड्रोन ड्रग्स सापडले, ज्याला 'म्याऊं म्याऊं' ओळखले जाते. चेतन फक्कड दंडवते, आनंद गीर मधु गीर गोसावी, अक्षय काळे, संजीव कुमार राउत आणि तौसिफ हसन मोहम्मद तस्लीम अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.

अशी झाली कारवाई

पोलिसांनी सांगितले की, या आरोपींपैकी दोघे नोएडाच्या एका फार्मा कंपनीत काम करतात. चौकशीत समोर आले की, त्यांना केमिकल आणि औषधाची चांगलीच माहिती होती आणि हे ड्रग्स एका फॅक्टरीमध्येच तयार करत होते. हे पाहची आरोपी चाकन शीक्रापुर रोडवरुन जात असताना पोलिसांना यांच्या कारच्या काळ्या काचवरुन संशय आला आणि त्यांनी कारची तपासणी केली. यात त्यांना कारमध्ये ड्रग्स आढळले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser