आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोक्का प्रकरणातील फरार महिलेला अटक:अमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यात आरोप, पुणे पोलिसांची कामगिरी

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यात मोक्कानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर पाच वर्षांपासून फरार असलेल्या सराईत महिलेला अंमली पदार्थ विरोधी पथक एकने मुंबईतुन अटक केली आहे. संबंधित महिलेविरुद्ध खुनाचा गुन्हाही दाखल आहे. जेलुखा मोहम्मद हुसेन कुरेशी ऊर्फ जुलैखाबी ऊर्फ जिल्लो (वय -४० रा, प्रभात कॉलनी लेन नं.९, सांताक्रुझ (ईस्ट) अंधेरी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.

अमली विरोधी पथकाने संगमवाडी ब्रिज परिसरात मेफेड्रोन तस्कराला अटक केले होते. चौकशीत त्याने मुंबईतील महिलेकडून मेफेड्रोन खरेदी केल्याचे सांगितले होते. संबंधित महिला सांताक्रुज मुंबई येथे राहत असल्याची माहिती पोलीस हवालदार मारुती पारधी आणि मनोजकुमार साळुंके यांना मिळाली.

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांनी सांताक्रुज मुंबईत धाव घेतली. महिलेचा शोध घेवुन अत्यंत शिताफीने तिला ताब्यात घेतले चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. अटकेत असलेली महिला सराईत गुन्हेगार असून अंमली पदार्थ विरोधी पथक मुंबई यांनी अनेक गुन्हे दाखल केले आहेत.

तर खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोक्कानुसार गुन्ह्यात संबंधित महिला फरार होती. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, एपीआय शैलजा जानकर, पोलीस मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, ज्ञानेश्वर घोरपडे, विशाल दळवी, राहुल जोशी, संदिप शिर्के प्रविण उत्तेकर, पांडुरंग पवार, विशाल शिंदे, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली.

''अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात मोक्कानुसार कारवाई झाल्यानंतर संबंधित महिला पाच वर्षांपासून फरार होती. तिची माहिती पथकाला मिळाल्यानंतर मुंबई सांताक्रूझ परिसरात तिला ताब्यात घेण्यात आले.'' - विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथक

बातम्या आणखी आहेत...