आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:पुण्यात तब्बल 2 कोटी 10 लाखांचे अमली पदार्थ जप्त, आठशे 68 किलो गांजा, साडेसात किलो चरस

पुणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एमडी अमली पदार्थांसह पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

आंध्र प्रदेश येथून महाराष्ट्रात विविध ठिकाणी होणाऱ्या गांजा आणि चरसच्या तस्करीचे रॅकेट सीमा शुल्क विभागाने (कस्टम) विभागाने उद‌्ध्वस्त केले. कस्टम विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ट्रकचा पाठलाग करून ८६८ किलो गांजा आणि साडेसात किलो चरस जप्त केले आहे. या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २ कोटी १० लाख रुपये असल्याची माहिती सहआयुक्त वैशाली पतंगे यांनी दिली.

आंध्र प्रदेशातील ग्रामीण भागातून महाराष्ट्रातील विविध भागांत अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. त्यानुसार कस्टम विभागाचे पथक अशा तस्करीवर बारीक लक्ष ठेवून होते. नलदुर्ग-सोलापूर रोडवर सोलापूर येथील बोरामणी गावाजवळ त्यांना बुधवारी (दि.२४) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास दोन संशयित ट्रक आढळून आले. कस्टम विभागाने ट्रकचा बोरामणी गावापासून पाठलाग केला. ते ट्रक पुण्यात आल्यानंतर त्याला अडवण्यात आले. ट्रकची तपासणी केली असता त्यांना ट्रकच्या टपावर १ कोटी ४ लाखांचा ८६८ किलो गांजा आणि दुसऱ्या ट्रकमधून साडेसात किलो वजनाचे ७५ लाखांचे चरस आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत २ कोटी १० लाख असल्याचे कस्टम विभागाने सांगितले.

एमडी अमली पदार्थांसह पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

अंमली पदार्थ विक्रीसाठी नवले पुलाजवळ आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक, पश्चिमने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५६ ग्रॅम मेथाफेटामाईन(एम.डी) आणि १ कार असा ५ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सकलेन अब्दुल बाकी कुरेशी व शकील रौफ सैय्यद अशी आरोपींची नावे आहेत.

बातम्या आणखी आहेत...