आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएसके प्रकरण:बँकांची जप्त रक्कम ठेवीदारांना समान वाटप तत्त्वानुसार द्यावी, 242 ठेवीदारांचा अर्ज

पुणे7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डीएसके प्रकरणात अालिशान गाड्यांचा लिलाव, बँकांमधून जप्त करण्यात आलेली रक्कम ठेवीदारांना समान वाटप तत्त्वानुसार मिळावी, अशी मागणी करणारे अर्ज येथील विशेष न्यायाधीश जे.एन.राजे यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. अॅड. चंद्रकांत बीडकर यांच्यामार्फत २४२ ठेवीदारांनी हे अर्ज दाखल केले आहेत. हळूहळू आणखी गुंतवणूकदार अशा प्रकारे न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याची माहिती अॅड. बीडकर यांनी दिली.

डीएसके प्रकरणात ३२ हजारहून अधिक ठेवीदारांची हजारो कोटींची फसवणूक झाली आहे. या प्रकरणात डीएसके, पत्नी, मुलगा, पुतणी, जावई यांच्यासह इतर अनेकांना अटक करण्यात आली आहे. एमपीआयडी, फसवणुकीसह विविध कलमांनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. ठेवीदारांना मुद्दल व व्याज जानेवारी २०१७ पासून दिलेले नाही. तीन वर्षांपासून या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याविषयी अॅड. चंद्रकांत बीडकर म्हणाले, या प्रकरणात डीएसके यांच्या गाड्यांचा लिलाव, बँकेतून जप्त केलेली रक्कम अशी अंदाजे १५ ते २० कोटी रुपयांची रक्कम न्यायालयात आहे. अनेक दिवसांपासून ही रक्कम न्यायालयत आहे. डीएसके यांनी स्वत: ही रक्कम ठेवीदारांना द्यावी, अशी लेखी संमती दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...