आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:दुबईत गेलेल्या कुटुंबाचे पुण्यात घर फोडले; 43 लाख लंपास

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दुबईत मुलीस भेटण्यासाठी गेलेल्या कुटुंबाचे पुण्यातील कोथरूड परिसरातील घर चोरट्यांनी फोडले. या वेळी चोरट्यांनी २ लाखांच्या रोकडसह एकूण ४३ लाखांचे सोन्यासह मुद्देमाल लंपास केला.

याप्रकरणी अज्ञात चाेरटयांविराेधात काेथरुड पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी साेमवारी दिली. याबाबत चंद्रशेखर केसरीनाथ चाैधरी (७९) यांनी आराेपी विराेधात पाेलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. ही घटना १३ ते २९ डिसेंबर काेथरुड परिसरातील रामबाग येथे घडली.

नववर्षासाठी कुटुंब बाहेर, चोरट्यांकडून २३ लाखांचा ऐवज लंपास: धायरतील हॉटेल व्यवसायिक असलेले आशिष अंकुश पासलकर (३३) हे कुटुंबासह नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पानशेत परिसरात हाॅटेलवर रहाण्यास गेले. यादरम्यान ३ अज्ञात चाेरटयांनी त्यांच्या घराचे मुख्य दरवाजाचे लॅच लाॅक ताेडून कपाटातील ५६९ ग्रॅम साेन्याचे दागिने, ३४० ग्रॅम चांदीचे दागिने व राेख रक्कम असा एकूण २३ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल घरफाेडी चाेरी करून लंपास केला. याप्रकरणी सिंहगड राेड पाेलिस ठाण्यात चाेरट्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...