आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लम्पीचा प्रभाव:देशात आतापर्यंत 85 हजार 628 जनावरं दगावले; राज्यात 2 हजार 528 पशुधनाचा मृत्यू

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लम्पी चर्म रोगाचा आलेख राज्यात घटत आहे. आतापर्यंत या रोगामुळे भारतात 85 हजार 628 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने राजस्थान मध्ये 55,448, पंजाबमध्ये 17,655, गुजरात मध्ये 5,857, हिमाचल प्रदेशमध्ये 4,347 व हरियानामध्ये 2,321 जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत.

राज्यात 2 हजार 528 पशुधन मृत्यूमुखी

महाराष्ट्रात आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील 421, अहमदनगर जिल्ह्यातील 252, धुळे जिल्हयात 35, अकोला जिल्ह्यात 393, पुणे जिल्ह्यात 136, लातूर मध्ये 25, औरंगाबाद 77, बीड 8, सातारा जिल्ह्यात 182, बुलडाणा जिल्ह्यात 367, अमरावती जिल्ह्यात 296, उस्मानाबाद 9, कोल्हापूर 117, सांगली मध्ये 24, यवतमाळ 3, परभणी - 2, सोलापूर 28, वाशिम जिल्हयात 37, नाशिक 8, जालना जिल्हयात 15, पालघर 2, ठाणे 28, नांदेड 25, नागपूर जिल्हयात 6, हिंगोली 1, रायगड 7, नंदुरबार 21, वर्धा 2 व गोंदिया - 1 असे एकूण 2 हजार 528 पशुधनाचा मृत्यू झाला आहे.

पशुपालकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले तरी त्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. सदरील रोगाचा उपचार लक्षणे दिसल्यानंतर वेळेतच सुरू झाल्यास, मृत्यूची शक्यता अत्यंत कमी असून बहुतांश पशु उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. तरी सर्व पशुपालकांनी लंपी चर्म रोगाच्या संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात 80.86 % लसीकरण

राज्यामध्ये 32 जिल्ह्यांमधील एकूण दोन हजार 238 गावांमध्ये लंपी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 59 हजार 865 बाधित पशुधनापैकी एकूण 31 हजार 179 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 115.11 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 113.14 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे व अकोला, जळगांव, कोल्हापूर, सांगली, वाशिम, मुंबई उपनगर आणि सातारा या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे 80.86 % गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...