आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांचे नियोजन फिसकटले:ढिसाळ नियोजनामुळे यंदा पुण्यातील मिरवणूक लांबली; 27 तासानंतरही मिरवणूक सुरूच

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे यंदा ही मिरवणूक लांबल्याचे दिसत आहे. पुण्यात शुक्रवारी सकाळी 10 वाजता सुरू झालेली मिरवणूक अद्यापही 27 तासानंतर ही सुरूच आहे. काल मानाच्या गणपती विसर्जनाला पहिल्यांदाच रात्रीचे 9.30 झाले. यामुळे मागे असलेली मंडळे ही हळू हळू पुढे सरकत होती.

मिरवणुकीचे नियोजन कोलमडले

पोलिसांनी नागरिकांची गर्दी निंयत्रीत न केल्यने विसर्जन मिरवणुकीचे नियोजन कोलमडले. असे असेले तरी ही मिरवणूक लवकर संपवण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे पोलिस आयुक्त गुप्ता म्हणाले. पण संध्याकाळ पर्यन्त ही मिरवणूक संपण्याची चिन्हे अद्याप तरी दिसत नाही.

बाप्पाला विसर्जनासाठी उशीर

दरवर्षी दगडूशेठ गणपतीला अल्का चौकात येण्यासाठी पहाटे 5 किंवा 6 होतात. पण 10.15 ला दगडूशेठ गणपती हा अल्का चौकात आला. मंडळात असलेल्या वाद्य पथकमध्ये मोठे अंतर पडले होते. त्यांना घाई करण्यासही पोलिस काहीच करत नव्हते. पोलिसांना गर्दीला आटोक्यात आणता आले नाही. अल्का चौकत नागरिक थांबल्याने मंडळांना पुढे जाण्यास अडचणी येत होत्या. शनिवारी सकाळी सात वाजले तरी प्रमुख मंडळे मुख्य विसर्जन मार्गावर पोहचली नव्हती. गणपतींच्या रथासमोर असलेली ढोल-ताशा पथके, डिजे इत्यांदीमुळे विसर्जन मिरवणुकांना उशीर होण्यास कारणीभूत ठरले.

दरम्यान, या नियोजन शून्य कारभाराबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना प्रश्न करण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, आज विसर्जन मिरणूक वेळेत संपवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मिरवणुकीतील ढोल ताशा पथकांमध्ये पडलेल्या अंतरामुळे विसर्जनासाठी वेळ लागला आहे. विसर्जन मिरवणूक वेळेत संपवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. त्यादृष्टीने संबंधित मंडळांसोबत झालेल्या बैठकमध्ये सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र, ढोल ताशा पथकांमुळे मिरवणुकांना विलंब झाला असे गुप्ता म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...