आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील कारागृहे क्षमतेपेक्षा अधिक संख्येने विशेषत: कच्च्या कैद्यांमुळे तुडुंब आहेत. काेराेनाकाळात सोशल डिस्टन्स नियमामुळे अडचणी निर्माण झाल्या. या पार्श्वभूमीवर उच्चाधिकार समितीने कच्च्या कैद्यांना संचित रजा व पॅराेलवर बाहेर साेडण्याचा निर्णय घेतला हाेता. मात्र, यामुळे राज्यभरातील कारागृह परिसरातील शेती आणि छोट्या उद्याेगातून मिळणाऱ्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला. उत्पादनात माेठी घट झाली आहे.
येरवडा, पैठण, नाशिक राेड, नागपूर, बुलडाणा, विसापूर, काेल्हापूर, माेर्शी, आैरंगाबाद, सांगली, सातारा अशा राज्यातील ३१ कारागृहांत शेतीकरिता एकूण ५९६.५९ हेक्टर जमीन उपलब्ध आहे. ज्या कैद्यांनी शिक्षा भाेगलेली आहे ते खुल्या कारागृहास पात्र ठरतात. ज्या कैद्यांची शिक्षा साैम्य स्वरूपाची आहे असे कैदी शेती व उद्याेग कामात गुंतवण्यात येतात. अशा प्रकारे राज्यात शेती क्षेत्रात १० ते १५ हजार आणि इतर छोट्या उद्योगांत १३ ते १४ हजार कैदी कार्यरत आहेत. या माध्यमातून कैद्यांना शेती व उद्याेगातील विविध कामे शिकून कारागृहाबाहेर पडल्यानंतर पुनर्वसनाचा एक नवीन मार्गही उपलब्ध हाेत आहे.
पालेभाज्या, फळभाज्यांसह गळीत धान्य शेतीच्या माध्यमातून पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य, गळीत धान्य पिके अशी उत्पादने कैदी घेत आहेत. पशुपालन, कुक्कुट, शेळीपालनासह शेणखतातून कंपाेस्ट खतनिर्मिती, दुग्ध उत्पादन घेतले जात आहे. पुण्यातील येरवडा कारागृहात दाेन एकर परिसरात ‘सेंद्रिय शेती प्रकल्प’ असून त्याद्वारे ३६ ते ७२ वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेता येत आहे.
वस्त्रोद्योग, चर्मकाम, शिवणकामात कैदी उद्याेग क्षेत्राच्या माध्यमातून कैदी वस्त्राेद्याेग, सुतारकाम, शिवणकाम, लाेहारकाम, चर्मकाम, धाेबीकाम, बेकरी उद्याेग, रंगकाम, कागद काम, माेटार वाॅशिंग यात कार्यरत असून गेल्या वर्षभरात कारागृह विभागास ८ काेटी २४ लाखांचे उत्पन्न मिळाले. तर, आैरंगाबाद, येरवडा व नागपुरात कैद्यांना ‘इलेक्ट्राॅनिक गॅजेटचे’ (वाहनांचे बॅटरी ते लाइटपर्यंतचे वायरिंग) काम देण्यात आले.
उत्पन्न वाढीस नव्याने प्रयत्न राज्यातील कारागृहांतील कैद्यांची माेठी संख्या पाहता काेराेनाकाळात विविध कारागृहातील कैदी काही काळ कारागृहाबाहेर साेडण्यात आलेले हाेते. त्यामुळे मागील ५ वर्षांच्या शेती क्षेत्रातील उत्पन्नाचा विचार करता गेल्या दाेन वर्षांत उत्पन्नात घट झाल्याचे दिसून येत आहे. हे उत्पादन व उत्पन्न वाढावे याकरिता आता पावले उचलण्यात येत आहेत. - राजाराम खरात, तंत्र अधिकारी (राज्य कारागृह शेती विभाग)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.