आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुंतवणूक:भारत-चीन वादादरम्यान चीनमधील तीन कंपन्या पुण्यात करणार 5 हजार कोटींची गुंतवणूक

पुणे10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लद्दाखच्या गलवान घाटीत भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक मारामारीपूर्वी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0'अंतर्गत एमओयूवर सोमवारी स्वाक्षऱ्या झाल्या

महाराष्ट्र सरकारने तीन चीनी कंपन्यांसह विविध देशातील 12 कंपन्यांसोबत 16,000 कोटी रुपयांच्या मोमेरेंडम ऑफ अंडरस्टँडिंगवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. एक अधिकृत वक्तव्यात सांगण्यात आले आहे की, तीन चीनी कंपन्यां 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तीची गुंतवणूक करणार आहेत. लद्दाखच्या गलवान घाटीत भारतीय आणि चीनी सैनिकांच्या हिंसक मारामारीपूर्वी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0' अंतर्गत एमओयूवर सोमवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. 

पुण्यातील तळेगावमध्ये चीन करणार गुंतवणूक

या अधिकृत वक्तव्यात सांगण्यात आले आहे की, चीमधील हेंगली इंजीनियरिंग, पीएमआई इलेक्ट्रो मोबिलिटी सॉल्यूशंस जेवी विद फोटॉन आणि ग्रेट वॉल मोटर्स पुणे जिल्ह्यातील तळेगावमध्ये गुंतवणूक करेल. हेंगली इंजीनियरिंग 250 कोटी आणि ऑटो सेक्टरमध्ये पीएमआई 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. तसेच, ग्रेट वॉल मोटर्स 3,770 कोटी रुपयांच्या गुंतवणूकसह एक ऑटोमोबाइल कंपनी सुरू करेल.

याशिवाय महाराष्ट्र सरकारने अमेरिका, दक्षिण कोरिया, सिंगापुर इत्यादी देशातील कंपन्यांसोबत करार केले आहेत. या कंपन्या ऑटोमोबाइल, लॉजिस्टिक्स, बँकिंग, इंजीनियरिंग आणि मोबाइल उत्पादनसारख्या विविध क्षेत्रातील आहेत.

या कंपन्या करणार गुंतवणूक

  • एक्सॉन मोबिल (अमेरिका) ऑइल एंड गॅस- इसाम्बे, रायगड 760 कोटी गुंतवणूक
  • हेंगली (चीन) इंजिनिअरिंग- तळेगाव सेक्ठर-2, पुणे 250 कोटी रुपये
  • सेंडास (सिंगापुर) लॉजिस्टिक- चाकण-, तळेगाव, पुणे, भिवंडी, ठाणे 560 कोटी रुपये
  • एपिजी डिसी (सिंगापुर) डेटा सेंटर- टीटीसी, ठाणे- महापे 1100 कोटी रुपये
  • इस्टेक (दक्षिण कोरिया) इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिजाईन - रांजणगाव, पुणे 120 कोटी रुपये
  • पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन जेवी विथ फोटोन (चीन) ऑटो-तळेगाव 1000 कोटी रुपये
  • रॅकबँक (सिंगापुर) डेटा सेंटर- ठाणे, हिंजेवाडी, पुणे 1500 कोटी रुपये
  • ग्रेट वॉल मोटर्स (चीन) ऑटो मोबाईल तळेगाव - पुणे 3770 कोटी रुपये
बातम्या आणखी आहेत...